Nashik : निदा खान प्रकरणात एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर, १७१ वादग्रस्त लिंक्स...

Nashik : नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीतील तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या निदा खान (Nida Khan) ४३ दिवसानंतर ताब्यात घेण्यात आले. तिची चौकशी सुरु आहे. आज तिची पोलीस कोठडीची मदत संपणार असून तिला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, एसआटीच्या तपासात निदा खान बाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत.



विशिष्ट धर्माबद्दल आकर्षण निर्माण करण्याचे ‘ब्रेनवॉशिंग’ सत्र


तपासासाठी निदा खानचा मोबाईल जप्त करण्यात आला असून या मोबाईल मधून धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. निदाने पीडितेच्या मोबाईलवर तब्बल १७१ वादग्रस्त लिंक्स पाठवल्या होत्या. या लिंक्सच्या माध्यमातून पीडितेच्या मनात स्वतःच्या धर्माबद्दल न्यूनगंड निर्माण करणे आणि विशिष्ट धर्माबद्दल आकर्षण निर्माण करण्याचे ‘ब्रेनवॉशिंग’ सत्र राबवण्यात आले होते. या डिजिटल पुराव्यांमुळे धर्मांतरासाठी वापरले जाणारे हे नवे ‘मॉडेल’ आता समोर आले आहे.


निदा स्वतः पीडितेला विशिष्ट धर्माचे शिक्षण देत होती

देवळाली कॅम्पमधील (Devlali Camp) पीडितेची मूळ ओळख पुसून टाकण्याचा कट निदाने रचला होता. पीडितेचे नामकरण ‘हानिया’ असे केले होते. इतकेच नाही, तर निदा स्वतः पीडितेच्या घरी जाऊन तिला विशिष्ट धर्माचे शिक्षण देणे, धार्मिक पेहराव परिधान करण्यास भाग पाडणे आणि विशिष्ट प्रार्थनांची सक्ती करणे, अशा कृती करत होती. पीडितेला पूर्णतः प्रभावाखाली घेण्यासाठी निदाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.



निदा, दानिश आणि तौसिफ यांची समोरासमोर चौकशी होणार


दानिश शेख आणि तौसिफ अत्तार हे या गुन्ह्यातील मुख्य संशयित आहे, या दोघांचा ताबाही आता एसआयटी घेणार आहे. महत्त्वाचे म्हणजे निदा, दानिश आणि तौसिफ या तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. यातून या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, हे स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.


मुंबई नाका पोलिसांनी या प्रकरणात कट रचणे आणि धार्मिक भावना दुखावण्याबाबतच्या कलमांत आणखी वाढ केली आहे. निदा खानची आज पोलीस कोठडी संपणार आहे, दरम्यान एसआयटीने जप्त केलेल्या १७१ लिंक्सचा तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी एसआयटी तिच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे करणार आहेत.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे