Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची SIT चौकशी

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर अखेर नाशिकमध्ये रविवारी विशेष पोलीस पथकाच्या (एसआयटी) चौकशीला सामोऱ्या गेल्या. या चौकशीदरम्यान त्यांनी ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून त्यांची कशी नियुक्ती झाली, तसेच त्यांनी कोणते काम केले याबाबतची माहिती दिली. याचबरोबर अशोक खरात यांच्याशी असलेल्या आर्थिक संबंधांबाबतही त्यांनी माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे.



मागील महिन्यात १६ मार्च रोजी भोंदू अशोक खरातच्या घरी नाशिकच्या गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून त्याला अटक केली होती. त्यानंतर भोंदू अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची रविवार १० मे २०२६ रोजी नाशिकमध्ये एसआयटीकडून चौकशी करण्यात आली. सकाळीच चाकणकर एसआयटी चौकशीसाठी पुण्याहून नाशिकमध्ये पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्यांनी थेट एसआयटी कार्यालयात हजेरी लावली. त्याठिकाणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडून त्यांची कसून चौकशी झाली. या चौकशीदरम्यान रुपाली चाकणकर यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या चौकशीत अशोक खरात प्रकरणात आणखी कोणती नवी माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले असून, पोलिसांनी यापूर्वीच अनेक जणांची चौकशी केली आहे. खरातला सध्या २२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.



तपास पूर्ण झाल्यावर सर्वांना उत्तरे मिळतील : चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, अशोक खरात याच्याशी संबंधित अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनात आहेत. ज्यावेळी हा तपास पूर्ण होईल, त्या तपासातूनच तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले. चाकणकर यांनी समता आणि जगदंबा पतसंस्थेतील सर्व खाती बनावट असल्याचा दावा केला. त्या म्हणाल्या की, “ती सर्व खाती बनावट आहेत आणि त्याचा अधिकृत अहवाल लवकरच समोर येईल.”

Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

ED's swift action : ऑनलाइन गेमिंग-बेटिंग प्रकरणात ईडीची धडक कारवाई

नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती