Monday, May 11, 2026

Nida Khan : 'तो' एक हाथ डोक्यावर म्हणून ४३ दिवस निदा खान मस्त राहिली; किराणा, चिकन सर्वच घरपोच

Nida Khan : 'तो' एक हाथ डोक्यावर म्हणून ४३ दिवस निदा खान मस्त राहिली; किराणा, चिकन सर्वच घरपोच

Nashik TCS Case :टीसीएस कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील संशयित्त निदा खानच्या अटकेनंतर अनेक गौप्यस्फोट समोर येण्यास सुरुवात झाली आहे. धक्कादायक म्हणजे ४३ दिवस गायब असलेली निदा नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात लपलेली होती. मतीन पटेल हे संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक आहेत. निदा खानला शोधण्यासाठी नाशिक पोलिसांनी कंबर कसली होती मात्र तिला शोधण्यात अपयश येत होते. अखेर ४३ दिवसानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने ती नाशिक पोलिसांच्या हाती आली.

२६ मार्चला निदा खान भिवंडीतून बेपत्ता झाली ती जवळपास सव्वा महिना छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावातील स्लम भागात लपून होती, विशेष म्हणजे, हे घर एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याचे होते. याच घरात निदा तळ ठोकून बसली होती. याठिकाणी निदा एकटी नसून तिचे आई, वडील, भाऊ आणि मावशी असे पाच जण तिथे वास्तव्यास होते. (Nashik TCS Case)

निदा आणि तिच्या कुटुंबियांना घरात काही कमी पडू नये, किराणा चिकन बाहेरून तिला जे काही हवे आहे ते मिळावे यासाठी नगरसेवक मतीन पटेलने स्वतःचा कार ड्रायव्हर तैनात केला होता. हा ड्रायव्हरच या कुटुंबाला किराणा, चिकन आदी अत्यावश्यक साहित्य पोहोचवत होता. ज्यामुळे कुठल्याही अडथळ्याशिवाय हे कुटुंब याठिकाणी ४३ दिवस राहू शकलं. (Nashik TCS Case)

या प्रकरणात निदाला पकडण्यासाठी एसआयटीचे प्रमुख व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आखलेली रणनीती महत्त्वाची ठरली. ‘एमएच १५’ या नाशिक पासिंगच्या गाड्या पाहून निदा सावध होईल, हे ओळखून पोलिसांनी औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांच्या पासिंगची वाहने वापरली. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि त्यांच्या टीमने सलग तीन दिवस मुस्लीमबहुल नारेगाव परिसरात साध्या वेशात वास्तव्य केले. स्थानिक गुन्हेगारांना किंवा नगरसेवकाच्या खबऱ्यांच्या मनात शंकाही येणार नाही, अशा पद्धतीने हे जाळे विणले गेले. आणि अखेर ४३ दिवस फरार निदा खान पोलिसांच्या तावडीत आली.

गुन्हेगाराला आश्रय देणे हा कायद्याने गुन्हा आहे. निदा खानला ४३ दिवस कुणी, कुठे आणि का वाचवले? तिला दररोजचा खर्च कुणी पुरवला ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मतीन पटेल आणि त्याच्या ड्रायव्हरला व इतरांना द्यावी लागणार आहेत. एसआयटीने आता या सर्वांची कुंडली काढण्यास सुरुवात केली आहे. 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >