Chandranath Rath Death : मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या निकटवर्तीयाच्या हत्येचा उलगडा; ३ आरोपी जेरबंद, एका 'UPI' पेमेंटमुळे लागला छडा!

कोलकाता : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी (Suvendhu Adhikari) यांचे अत्यंत विश्वासू सहकारी चंद्रनाथ रथ (Chandranath Rath) यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात पश्चिम बंगाल (West Bangal) पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या हायप्रोफाईल प्रकरणाचा कसून तपास करताना पोलिसांनी बिहार आणि उत्तर प्रदेश या शेजारील राज्यांमधून तीन संशयित आरोपींना सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत. या अटकेमुळे तपासाला आता एक ठोस दिशा मिळाली आहे.



दोन राज्यांतून धाडसी कारवाई करत तिघे ताब्यात


गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष पथके तयार केली होती. या पथकांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत बिहारमधील बक्सर येथून मयंक राज मिश्रा आणि विकी मौर्य या दोन मुख्य संशयितांना ताब्यात घेतले. त्याच वेळी, एका दुसऱ्या तपास पथकाने उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून राज सिंह नावाच्या तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ६ मे रोजी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम भागात रात्रीच्या वेळी ही राजकीय हत्या घडवून आणण्यात आली होती. तपासाधिकाऱ्यांच्या मते, अटक करण्यात आलेले हे तिघेही व्यावसायिक 'सुपारी किलर' (Hitmen) आहेत. त्यांना या विशिष्ट हत्येसाठी परराज्यातून भाड्याने बोलावण्यात आले होते. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) अधिकाऱ्यांनी रविवारी या तिघांचीही मॅरेथॉन चौकशी केली. या सखोल चौकशीनंतर मध्यमग्राम पोलिसांनी त्यांना अधिकृतपणे अटक केली आहे.



टोल नाक्यावरील एका 'UPI' पेमेंटने केला घात!


कोणताही गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एक चूक नक्कीच करतो, हे या प्रकरणात पुन्हा सिद्ध झाले. हत्येचा थरार घडवून आणल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढत असताना आरोपींनी बाली टोल नाक्यावरून आपले वाहन नेले. टोल भरण्यासाठी त्यांनी घाईघाईत 'UPI' (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) चा वापर केला. त्यांची हीच डिजिटल चूक पोलिसांसाठी ब्रह्मास्त्र ठरली. या एका व्यवहारामुळे पोलिसांना थेट एका संशयिताचा मोबाईल क्रमांक मिळाला आणि तपासाचे चक्र वेगाने फिरले.



सीसीटीव्ही आणि 'क्लोन' कारचा उलगडा


टोल नाक्यावरील उच्च क्षमतेच्या (HD) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी या वाहनाचे आणि त्यातील प्रवाशांचे स्पष्ट चेहरे टिपले होते, ज्यामुळे ओळख पटवणे सोपे झाले. याशिवाय, गुन्हेगारांनी रथ यांच्या एसयूव्ही (SUV) गाडीला अडवण्यासाठी ज्या चंदेरी रंगाच्या हॅचबॅक कारचा वापर केला होता, ती चक्क एक 'क्लोन' (बनावट) कार असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवर लावलेली नंबर प्लेट सिलीगुडी येथील एका खऱ्या कारची होती. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी एका ऑनलाइन वाहन विक्री पोर्टलवरून फोटो चोरून ही हुबेहूब बनावट नंबर प्लेट तयार केली होती. हल्लेखोर परराज्यातील असल्याने या कटाचे स्थानिक धागेदोरे शोधण्यासाठी पश्चिम बंगाल पोलिसांची पथके आता उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तळ ठोकून आहेत. प्रत्यक्ष शार्पशूटर्स पोलिसांच्या जाळ्यात अडकले असले, तरी सीआयडीचे (CID) मुख्य लक्ष आता स्थानिक पातळीवर कट रचणाऱ्या 'मास्टरमाईंड'वर आहे. या हत्येची सुपारी नेमकी कोणी दिली आणि यामागचा खरा सूत्रधार कोण आहे, हे शोधण्यासाठी तपास यंत्रणा कंबर कसून कामाला लागल्या आहेत.



परदेशी घातक शस्त्रास्त्रांच्या वापराने गुप्तचर यंत्रणाही चक्रावल्या


चंद्रनाथ रथ यांच्या हत्येमागील नेमका हेतू काय होता, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, या हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार पाहून पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्याही भुवया उंचावल्या आहेत. हत्येसाठी 'ऑस्ट्रियन बनावटीचे ग्लॉक ४७एक्स' (Glock 47X) हे अत्यंत अत्याधुनिक आणि प्राणघातक पिस्तूल वापरण्यात आले होते. राज्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या विदेशी आणि हाय-टेक शस्त्रास्त्रांचा वापर वाढल्याने, राज्य आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसाठी ही एक मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.


Comments
Add Comment

Rajasthan School Audit Report : राजस्थानमधील ६११ सरकारी शाळांना स्वतःची इमारतच नाही; विधानसभेत ऑडिट रिपोर्ट सादर

राजस्थानमधील सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधांची अत्यंत दयनीय अवस्था विधानसभेत सादर करण्यात आलेल्या एका

Pizza company gets fine : १० इंचाच्या ऐवजी मिळाला ७ इंचाचा पिझ्झा; ग्राहक आयोगाचा दणका, कंपनीला भरावा लागला मोठा दंड!

आजकाल ऑनलाइन जेवण मागवणे जितके सोपे झाले आहे, तितकेच त्यात फसवणुकीचे प्रकारही वाढले आह

26/11 Mumbai Attack Hafiz Saeed : हाफिज सईदसह ६ पाकिस्तानी आरोपींवर भारतात ‘इन-अबसेंटिया’ खटला; कायदेशीर प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : २००८ च्या मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याला जवळपास १८ वर्षे उलटून गेल्यानंतर भारताने या

Jantar Mantar Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील हिंसाचाराची होणार चौकशी; सुप्रीम कोर्टाकडून ५ सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना

नवी दिल्ली : जंतरमंतरसह देशातील विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार आणि

National Teachers Awards : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर! देशभरातील ४८ शिक्षकांची निवड; महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली, दि. २२ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण

Viral News : नवरी नटून-थटून मंडपात उभी होती, अचानक घडला असा प्रकार अन् थेट डॉक्टर बनून उपचारासाठी धावली

केरळ : केरळमधील कन्नूर (Kannur) येथे एका नवविवाहित डॉक्टरने आपल्या लग्नाच्या आनंदातही डॉक्टर (Doctor) म्हणून असलेले