Modi Norway Visit : पेट्रोल - डिझेलचा जपून वापर करण्याचे आवाहन केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा दोन दिवसांचा नॉर्वे दौरा, देशासाठी का महत्त्वाचा ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नॉर्वे दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा १८ आणि १९ मे रोजी असेल. देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक काढून ही माहिती दिली आहे. मोदींचा दौरा हा एक ऐतिहासिक दौरा असेल. कारण १९८३ पासून कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी नॉर्वेला भेट दिलेली नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.



ओस्लो येथे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी नियोजन सुरू आहे. लष्करी आणि राजकीयदृष्ट्या हा दौरा भारतासाठी महत्त्वाचा आहे. मोदींच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि नॉर्वे व्यापार, हवामान, तंत्रज्ञान आणि जागतिक सुरक्षा यांसारख्या विविध विषयांवर चर्चा करतील. नॉर्डिक-भारत शिखर परिषद पण होईल. या परिषदेत डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड, स्वीडन आणि नॉर्वे या नॉर्डिक देशांचे नेते उपस्थित असतील. हे सर्व नेते पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार आहेत. ही शिखर परिषद दोन्ही प्रदेशांमधील राजकीय संवाद आणि आर्थिक सहकार्य दृढ करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच मोदी नॉर्वे-भारत व्यवसाय आणि संशोधन शिखर परिषदेत भारतीय व नॉर्वेजियन व्यावसायिक प्रतिनिधींना भेटतील.



भारत आणि नॉर्वे यांनी २०२४ मध्ये एका मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शवली होती, जो गेल्या वर्षी अंमलात आला. या करारामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत भारत आणि नॉर्वे यांच्यातील व्यापार दुप्पट झाला असून, येत्या काही वर्षांत गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य आणखी वाढण्याची शक्यता आहे. मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारत आणि नॉर्वे यांच्यातील व्यापार आणि तांत्रिक सहकार्य अधिक दृढ होण्याची शक्यता आहे.



नॉर्डिक-भारतीय शिखर परिषदेत ग्रीन ट्रान्झिशन, डिजिटलायझेशन, इनोव्हेशन आणि व्यापार यांसारख्या विषयांवर चर्चा होणार आहे. परस्पर सहकार्यासाठी राजकीय पातळीवर सविस्तर चर्चा होणार आहे. दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

Comments
Add Comment

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी

National Teacher Award 2026 : उच्च शिक्षण - तंत्रनिकेतन क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश

नवी दिल्ली : देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१