Donald Trump China Visit : डोनाल्ड ट्रम्प लवकरच करणार चीन दौरा; व्यापार, तैवान आणि पश्चिम आशिया संकटावर चर्चा होण्याची शक्यता

सुमारे नऊ वर्षांनंतर एखादा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष चीनच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज म्हणजेच सोमवार ११ मे रोजी याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या घोषणेत म्हंटलं आहे कि; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १३ ते १५ मे दरम्यान चीनच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून होत आहे. (Donald Trump China Visit)



पश्चिम आशिया संकटावर चर्चा होण्याची शक्यता :


अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाढते संकट आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत वाढती चिंता अशा पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय तैवान, व्यापार आणि सामरिक स्पर्धा यांसारख्या मुद्द्यांवर अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावही कायम आहे. (Donald Trump China Visit)



राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक :


व्हाईट हाऊसच्या प्रिन्सिपल डेप्युटी प्रेस सेक्रेटरी अॅना केली यांच्या माहितीनुसार, ट्रम्प बुधवारी संध्याकाळी बीजिंगमध्ये पोहोचतील. गुरुवारी त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार असून त्यानंतर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होईल. कार्यक्रमात टेंपल ऑफ हेवनला भेट आणि राजकीय मेजवानीचाही समावेश आहे. यानंतर शुक्रवारी दोन्ही नेते पुन्हा एकदा भेटणार असून चहापान आणि वर्किंग लंचचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावर्षाच्या अखेरीस शी जिनपिंग यांचा अमेरिकेचा दौरा होण्याची शक्यता असल्याचे संकेत अमेरिकेकडून देण्यात आले आहेत. (Donald Trump China Visit)


जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील शुल्क आणि व्यापार करारांबाबत अपेक्षा वाढलेल्या असताना ट्रम्प यांचा हा दौरा होत आहे. दोन्ही देशांनी रविवारी जाहीर केले की चीनचे उपपंतप्रधान हे लिफेंग १२ आणि १३ मे रोजी दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांच्यासोबत व्यापार चर्चेच्या अंतिम टप्प्यात सहभागी होणार आहेत. ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी व्यापारातील तणाव कमी करण्यासाठी या चर्चांचा उपयोग होणार असल्याचे मानले जात आहे. (Donald Trump China Visit)



चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, दक्षिण कोरियातील बुसान येथे होणारी ही चर्चा दोन्ही नेत्यांमधील महत्त्वाच्या सहमतीवर आणि अलीकडील दूरध्वनी संभाषणावर आधारित असेल. या चर्चेत आर्थिक आणि व्यापारविषयक मुद्द्यांवर विशेष भर दिला जाणार आहे.दरम्यान, तैवानचा मुद्दा ट्रम्प-शी चर्चेच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की तैवानबाबत अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. अधिकाऱ्यांच्या मते, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात तैवानच्या मुद्द्यावर सातत्याने चर्चा होत असली तरी अमेरिकेचे अधिकृत धोरण पूर्वीप्रमाणेच कायम आहे.



अमेरिकन अधिकाऱ्यांनी तैवानला शस्त्रविक्रीच्या मुद्द्याचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प प्रशासनाने त्यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या वर्षातच तैवानला मागील प्रशासनाच्या संपूर्ण चार वर्षांच्या तुलनेत अधिक शस्त्रविक्रीला मंजुरी दिली होती. यावरून स्पष्ट होते की चीनच्या दबावानंतरही अमेरिका तैवानला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत कोणतीही नरमाई दाखवण्याच्या तयारीत नाही. (Donald Trump China Visit)

Comments
Add Comment

Cesar Gastelum : मेक्सिकोत प्रसिद्ध टिकटॉक इन्फ्लुएन्सर सीझर गॅस्टेलम यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या; जगभरात खळबळ

मेक्सिको : सोशल मीडियाच्या आभासी जगात आपल्या अनोख्या विनोदी शैलीने लाखो प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा एक

Donald Trump : थोडक्यात बचावले...! ट्रम्प यांच्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळला; प्रवासी विमान अगदी जवळ आल्याने खळबळ

Donald Trump  : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रवास करत असलेल्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरशी संबंधित गंभीर घटना समोर

Bangladesh : शेख हसीनांच्या कार्यक्रमानंतर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; बांगलादेशात तणाव

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या वडिलोपार्जित घरावर पेट्रोल बॉम्बने

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Pakistan : पाकिस्तानने सीमेवर तैनात केल्या चिनी तोफा, भारत सावध; राष्ट्रहितासाठी योग्य ती कारवाई करू, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली माहिती

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताशी खेटून असलेल्या सीमेवर चिनी तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. काही

Foreign Journalists in Pakistan : POK मधील सत्य लपवण्याचा प्रयत्न? पाकिस्तानने परदेशी पत्रकारांसाठी लागू केले नवे नियम

इस्लामाबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) मधील आंदोलनांवर करण्यात आलेल्या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरावर