The Indian Coast Guard : आयसीजीएस अचल भारतीय तटरक्षक दलात दाखल

पणजी : भारतीय तटरक्षक दलाने गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे, नवीन पिढीच्या अदम्य -श्रेणीतील जलद गस्ती जहाज मालिकेतील जहाज, इंडियन कोस्ट गार्ड शिप (आयसीजीएस) अचल ताफ्यात दाखल करून आपल्या परिचालन क्षमतेत लक्षणीय वाढ केली आहे.'अचल' या नावाचा अर्थ 'अढळ' असा असून, हे जहाज राष्ट्रीय सागरी हितांचे रक्षण करणे, समुद्रात जीवनाचे रक्षण करणे आणि भारताच्या सागरी सीमांची सुरक्षा सुनिश्चित करण्याबाबत भारतीय तटरक्षक दलाच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हे जहाज किनारी आणि सागरी देखरेख , प्रतिबंध, शोध आणि बचाव , तस्करीविरोधी मोहीम आणि सागरी प्रदूषण प्रतिसाद यासह विविध प्रकारच्या सागरी मोहिमा हाती घेईल.


पोलीस महानिरीक्षक टेकूर शशी कुमार, कमांडर, तटरक्षक विभाग (वायव्य), केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी यांच्या सन्माननीय उपस्थितीत,संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि महासंचालक (अधिग्रहण) ए. अंबरासू यांच्या हस्ते हे जहाज औपचारिकपणे सेवेत दाखल करण्यात आले.



मेसर्स गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे स्वदेशी बनावटीची रचना आणि बांधणी असलेले हे जहाज, भारताच्या जहाजबांधणी क्षमतेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 50 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा समावेश असलेले हे जहाज, संरक्षण उत्पादनातील देशाचे वाढती स्वयंपूर्णता अधोरेखित करते आणि केंद्र सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' व 'मेक इन इंडिया' उपक्रमांना अनुरूप आहे.आयसीजीएस अचल ताफ्यात दाखल होणे हे भारतीय तटरक्षक दलाच्या विद्यमान ताफा विस्तार कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि ते तटीय सुरक्षा मजबूत करण्यात आणि परिचालन सज्जता वाढवण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल.

Comments
Add Comment

Swine Flu : महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटकात 'स्वाईन फ्लू'च्या रुग्णांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र,

India China Border : भारत-चीन सीमा विवादावर टप्प्याटप्प्याने तोडग्याची तयारी

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील सहा दशकांहून जुना सीमा विवाद टप्प्याटप्प्याने सोडवण्याच्या दिशेने हालचाली

FSSAI New Rules : पॅकबंद पदार्थांच्या पाकिटांवर आता दिसणार 'धोक्याचा सिम्बॉल'

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर ताश्याऱ्यानंतर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने पॅकबंद

Vishwa Hindu Parishad : दुर्गापूजा मंडपांमध्ये मांसाहारी पदार्थ टाळण्याचे विहिंपचे आवाहन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) पूजा आयोजकांसाठी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी उझबेकिस्तान आणि किर्गिझस्तानच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तान आणि किर्गिझ प्रजासत्ताकच्या चार दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले

POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोष उसळला; लष्करी नियंत्रणाविरोधात ‘संयुक्त आवामी कृती समिती’चे मोठ्या आंदोलनाचे आवाहन

पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) पाकिस्तानी लष्कराच्या दडपशाहीविरोधात तेथील नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला आहे.