Thalapathy Vijay : थलपती विजय सोमवारी राज्यपालांना भेटणार, जुळवलेल्या सत्ता समीकरणाची माहिती देणार

चेन्नई : थलपती विजय उर्फ चंद्रशेखरन जोसेफ विजय याच्या नेतृत्वात तामिळनाडूत नव्या सरकारची स्थापना होण्याची शक्यता वाढली आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी थलपती विजय लवकरच राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेणार आहे. या भेटीवेळी तो १२१ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्याची शक्यता आहे.



सत्तेसाठी थलपती विजयच्या टीव्हीके या पक्षाने एकूण पाच पक्षांचा पाठिंबा मिळवला आहे. यामुळे सत्ताधारी आमदारांची संख्या १२१ च्या घरात पोहोचली आहे. टीव्हीकेला काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएल यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. टीव्हीकेचे १०८ आमदार निवडून आले आहेत. पण विजय दोन मतदारसंघात विजयी झाला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत तो एका मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा देईल आणि तिथे पोटनिवडणूक होईल. अद्याप हा राजीनामा आलेला नसल्यामुळे कागदोपत्री टीव्हीकेचे १०८, काँग्रेसचे ५ तर सीपीआय, सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएल यांचे प्रत्येकी दोन असे एकूण १२१ आमदार आहेत. यामुळे २३४ आमदारांच्या तामिळनाडू विधानसभेत विजयकडे बहुमत असल्याचे दिसत आहे. या बहुमताच्या जोरावर थलपती विजय राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.



तामिळनाडूत सत्तास्थापनेसाठी २३४ आमदारांच्या विधानसभेत ११८ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. विजयकडे यापेक्षा जास्त आमदार असल्यामुळे तो सत्ता स्थापनेचा दावा करणार हे निश्चित आहे. विजयने राजीनामा दिला तर पोटनिवडणुकीचा निकाल येऊन नव्या आमदाराने शपथ घेईपर्यंत सभागृहाची सदस्य संख्या २३३ असेल आणि बहुमताचा जादुई आकडा (मॅजिक फिगर) ११७ असेल.



विजयने पहिल्यांदा राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेची संधी मिळावी अशा स्वरुपाचे पत्र दिले नव्हते. त्याने स्वतःच्या १०८ आमदारांसह काँग्रेसच्या ५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे ११२ जणांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले होते. यामुळेच राज्यपालांनी विजयला बहुमत घेऊन ये आणि सत्ता स्थापनेचा दावा कर अशी सूचना केली. आता विजयने १२१ आमदारांची जुळवाजुळव झाल्यानंतर राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आहे.

Comments
Add Comment

Shiv Sena UBT : उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मुख्य

Shivsena: एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास; उबाठा, मनसेसह विविध पक्षांना धक्का, शिवसेनेत मोठे इनकमिंग

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राज्यभरातील विविध राजकीय

Maharashtra SIR : राज्यातील २.०७ कोटी मतदार 'एसआयआर' बाहेर; एकूण ७.७१ कोटी अर्ज जमा; १७.६३ लाख दुबार मतदारांची नोंद

मुंबई : राज्यातील मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम १७ ऑगस्ट रोजी संपली

Vinod Tawde : बिहारनंतर उत्तर प्रदेश जिंकण्याची जबाबदारी विनोद तावडेंकडे

- राष्ट्रीय सरचिटणीस पदासोबतच 'यूपी'च्या प्रभारी पदी नियुक्ती मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय

CM Devendra Fadnavis : सहकारी पक्षातील मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा अंकुश

- कोणत्याही मंत्र्यांचे निर्णय फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकार; शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात

Devendra Fadnavis : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार; महाराष्ट्र शासनाच्या नियमांत महत्त्वाचा बदल

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने ‘महाराष्ट्र शासन