मुंबई : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’' (Corporate Jihad') प्रकरणी सखोल चौकशी करून राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) तयार केलेला ५० पानांहून अधिकचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या अहवालात आयोगाने २५ हून अधिक महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या असून, या शिफारसींनुसार दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. (50-page report submitted to Chief Minister on Nashik 'corporate jihad' case)
Maharashtra Heavy Rain Alert : राज्यात दुहेरी हवामानाचं चित्र आहे. एकाबाजूला हैराण करून सोडणारा उकाडा तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस. राज्यात पुढील आठवड्यात 14 मे ते 20 मे ...
नाशिकमधील प्रकरणाची गंभीर दखल
नाशिकमधील टीसीएस कंपनीत घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत हरियाणाचे माजी पोलीस महासंचालक बी. के. सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील मोनिका अरोरा आणि आयोगाच्या वरिष्ठ समन्वयक लीलाबती यांचा समावेश होता. या समितीने १८ व १९ एप्रिल रोजी नाशिकचा दौरा केला, या दौऱ्यामध्ये पीडित महिला, पोलीस अधिकारी आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेतून समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांनी हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या अहवालात कार्यस्थळी महिलांची सुरक्षितता, त्यांचा सन्मान आणि न्याय सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. जबाबदारी निश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना सुचवतानाच, जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज समितीने अधोरेखित केली आहे.
मुंबई : खराब हवामानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी गुरुवारी देशभरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पंतप्रधान ...
संजय शिरसाट यांचे धक्कादायक आरोप
दरम्यान, पत्रकार परिषद घेऊन शिरसाट यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. निदा खान प्रकरणात ज्या नवा घटना घडत आहेत, ती माहिती समोर येत असून अत्यंत धक्कादायक आहे. निदाला तिथे कुणी पाठवलं याचा खुलासा झाला पाहिजे. निदा मुंब्र्याला का गेली नाही? ती एमआयएमच्या संपर्कात होती. इम्तियाज जलील तिला नाशिकला जाऊन भेटले होते. इम्तियाज जलील यांनीच तिला घर देण्यासाठी नगरसेवकाला भाग पाडलं, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. धर्मांतर करणं, लव्ह जिहाद करणं, नशेखोर बनवणं अशा तीन स्टेजवर ही यंत्रणा काम करत आहे. हा गंभीर प्रकार आहे. याला राजकीय वळण देऊ नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.
एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान (Nida Khan) हिला पोलिसांनी अटक केली असून तिला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, निदा खानला लपवून ठेवण्यात 'एमआयएम'च्या एका नगरसेवकाचा हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी नगरसेवक मतीन पटेलला (Mateen Patel) ताब्यात घेऊन या प्रकरणात सहआरोपी केले आहे. त्यामुळे हे प्रकरण आता पुढे काय वळण घेते , हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.





