Vinod Tawde : बिहारनंतर उत्तर प्रदेश जिंकण्याची जबाबदारी विनोद तावडेंकडे

- राष्ट्रीय सरचिटणीस पदासोबतच 'यूपी'च्या प्रभारी पदी नियुक्ती


मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत ज्येष्ठ नेते आणि खासदार विनोद तावडे (Vinod Tawde) यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी पुनर्निवड करण्यात करण्यात आल्यानंतर, आता त्यांच्याकडे देशातील सर्वात महत्त्वाच्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (BJP National President Nitin Nabin) यांनी याबाबत घोषणा केली.



अडीच वर्षांनी होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीआधी येत्या काळात अत्यंत महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांकडे २०२९ च्या लोकसभेआधीची 'सेमी फायनल' मानले जात असून, त्यादृष्टीने भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशसह तीन महत्त्वाच्या राज्यांत नव्या प्रभाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याकडे उत्तर प्रदेश, सतीश पुनिया यांच्याकडे पंजाब, तर तरुण चुघ यांच्याकडे गुजरात भाजपच्या प्रभारीपदाची धुरा देण्यात आली आहे.



देशातील सर्वाधिक लोकसंख्या आणि लोकसभा जागा असलेल्या उत्तर प्रदेशमधील पक्षीय कामगिरीचा राष्ट्रीय राजकारणावर थेट परिणाम होत असतो. याआधी बिहार विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी आपल्या रणनीतीचा आणि उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्याचा करिष्मा दाखवला होता. त्यामुळे आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यात योग्य समन्वय साधून विजयाचा मार्ग सुकर करण्याची महत्त्वाची भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे.


भाजपच्या राजकीय रचनेत प्रदेश प्रभारी हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. केंद्र आणि राज्य संघटनेतील दुवा म्हणून प्रभारी काम पाहतात. पक्षाचा विस्तार करणे, स्थानिक नेत्यांमधील अंतर्गत मतभेद मिटवून ताळमेळ बसवणे आणि केंद्रीय नेतृत्वाने ठरवलेली निवडणूक रणनीती प्रत्यक्ष जमिनीवर यशस्वीपणे राबवणे, हे प्रभारींचे मुख्य काम असते. (Vinod Tawde)

Comments
Add Comment

Rishabh Pant New Record : षटकारांचं शतक तेही सर्वात जलद! रिषभ पंतने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

गॉल : भारताचा स्टार विकेटकीपर-बॅटर रिषभ पंतने (Rishabh Pant) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इतिहास

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी

IND vs SL 1st Test: मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये! श्रीलंकेच्या अनुभवी खेळाडूला दुखापत; गॉल टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेच्या

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Nashik : आई-बाबा घराबाहेर पडले अन् घरी येताच पायाखालची जमीन सरकली, दोन चिमुकल्या लेकींचा मृत्यू ; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं ?

Nashik News : आपलं घर असावं, हसतं खेळतं कुटुंब असावं आणि आपल्या मुलांचा भविष्य उज्ज्वल असावं असं प्रत्येकालाच वाटतं