Maharashtra Rain Alert : ऐन उन्हाळ्यात 'या' दिवशी राज्यात जोरदार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Heavy Rain Alert : राज्यात दुहेरी हवामानाचं चित्र आहे. एकाबाजूला हैराण करून सोडणारा उकाडा तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस. राज्यात पुढील आठवड्यात 14 मे ते 20 मे या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा राज्याला बसेल. या आठवड्याच्या अखेरीस काही भागात पावसाचे आगमन झाले असून तर पुढील आठवड्यात इतर भागात मुसळधार पाऊस राज्याला झोडपून काढण्याची शक्यता आहे. त्यासोबतच राज्यातील अनेक भागात गारपीट होण्याचीही दाट शक्यता आहे.


'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट


हवामान विभागानुसार, कोकण क्षेत्रातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण वारे वाहतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरीत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)



हवामान विभागाने धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील काही पट्ट्यात गारपि‍टीचा अंदाज वर्तवला आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, सोलापूर जिल्ह्यात वेगवान वारे वाहतील. वि‍जांचा कडकडाट होईल. तर गारपीट होण्याचीही शक्यता आहे.



रत्नागिरी मध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचे सावट आहे. संगमेश्वर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी लागली. संगमेश्वर बाजारपेठ परिसरातील रस्ते- नाले पावसाने तुडुंब भरले आहे. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे व्यावसायिक व नागरिकांची तारांबळ उडाली.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०