नवे 'सीडीएस' एन. एस. राजा सुब्रमणी यांचा प्रेरणादायी प्रवास
देशाच्या तिन्ही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्याची सर्वोच्च जबाबदारी मिळालेल्या सुब्रमणी यांचा लष्करी प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (NDA) प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर डिसेंबर १९८५ मध्ये ते 'गढवाल रायफल्स'मधून भारतीय लष्करात रुजू झाले. त्यांनी ब्रिटनमधील 'जॉइंट सर्व्हिसेस कमांड स्टाफ कॉलेज'मध्ये उच्चस्तरीय लष्करी प्रशिक्षण घेतले आहे. तसेच, दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेज, लंडनमधील किंग्स कॉलेज (MA) आणि मद्रास विद्यापीठातून (M Phil) त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. भारतात परतल्यानंतर त्यांनी एका माउंटेन ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर म्हणूनही काम पाहिले आहे.Government of India appoints Lt Gen NS Raja Subramani PVSM, AVSM, SM, VSM (Retd.) as the next Chief of Defence Staff, who will also serve as Secretary, Department of Military Affairs. He will assume office after Gen Anil Chauhan completes his tenure on 30 May 2026.
A highly… pic.twitter.com/wnbeitcpyX — Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) May 9, 2026
३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि सर्वोच्च सन्मान
दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार आणि 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या नव्या राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा 'थलपती' विजय (Thalapathy Vijay ) यांच्या ...
नौदलाची कमान कृष्ण स्वामीनाथन यांच्या हाती
दुसरीकडे, भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्त झालेले व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन हे १९८७ मध्ये नौदलात रुजू झाले. खडकवासला येथील एनडीएचे माजी विद्यार्थी असलेल्या स्वामीनाथन यांनी ब्रिटन आणि अमेरिकेतील नेव्हल वॉर कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले आहे. आपल्या गौरवशाली कारकिर्दीत त्यांनी आयएनएस विद्युत, आयएनएस विनाश, आयएनएस म्हैसूर आणि भारताची शान असलेली विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विक्रमादित्य' यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या युद्धनौकांचे यशस्वी नेतृत्व केले आहे.Government appoints Vice Admiral Krishna Swaminathan, PVSM, AVSM, VSM as the next Chief of the Naval Staff. Currently serving as FOC-in-C, @IN_WNC, the Admiral brings nearly four decades of distinguished service, with extensive operational, strategic & personnel management… pic.twitter.com/5tFs4eR2xJ
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) May 9, 2026





