RR VS GT : आज आयपीएलमध्ये गुजरात विरुद्ध राजस्थानची लढत, दोंघांसाठीही निर्णायक सामना

IPL 2026 : आज आयपीएलमध्ये जयपुरच्या सवाई मांनसिक स्टेडियमवर ५० वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यत होणार आहे. आयपीएल २०२६ मध्ये रियान परागच्या नेतृत्वात राजस्थानने आतापर्यंत १० सामन्यांत ६ सामने जिंकले आहेत आणि १२ गुणांसह गुणतालिकेत चवत्या स्थानावर आहे. शुभमन गीलच्या नेतृत्वात गुजरातने आता पर्यंत १० सामन्यांत ६ सामने जिंकले आहे आणि १२ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे . या दोघंनीही आतापर्यंत सहा- सहा सामने जिंकले आहेत. यामुळे हा सामना दोघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्तवाचा ठरणार आहे.


हेड टु हेड


आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात नऊवेळा आमना - सामना झाला आहे. यात गुजरात सहा विजयांसह आघाडीवर आहे. मात्र मागील पाच सामन्यांमध्ये राजस्थानने तीनवेळा गुजरातचा पराभाव केला आहे. तर गुजरातला दोनदा हरवण्यात राजस्थानला यश आले आहे.या हंगामात गुजरातसाठी साई सुदर्शने १० सामन्यांत ३८५ धवा केल्या आहेत. गोलंदाजीत कगिसो रबाडा ने चांगली कामगिरी करत १० सामन्यात १६ विकेट्स घेतल्या आहेत . राजस्थानसाठी १५ वर्षीय खेळाडु वैभव सुर्यवंशीने चांगली कामगिरी केली आहे. त्याने १० सामन्यात २३७ च्या स्टईकरेटने ४०४ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत इंग्लडच्या जोफ्रा आर्चरने १० सामन्यात १५ विकेट्स घेतल्या आहेत.



कशी असेल खेळपट्टी ?


आज राजस्थान विरुद्ध गुजरातचा सामना जयपुरच्या सवाई मानसिंक स्टेडियमवर खेळपट्टी क्रमांक सहा वर खेळला जाणार आहे. यंदाच्या हंगामात जयपुरमध्ये सर्वात मोठे टोट्ल करण्यात आले आहे. यात राजस्थान ला दोन्ही वेळा २०० पेक्षा अधिक धावा बचाव करण्यात अपयश आले आहे. या सामन्यांतही मोठी धावासंख्या होण्याची शक्यता आहे. सवाई मानसिंक स्टेडियमर आतापर्यंत आयपीएलचे ६६ सामने झाले आहेत. यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तेवीस वेळा सामने जिंकला आहे, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला ४३ वेळा विजय मिळाला आहे. यामुळे नाणेफेक महत्तवाचा ठरणार आहे.




संभाव्य प्लेइंग-12


राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, बृजेश शर्मा आणि तुषार देशपांडे.


गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, निशांत सिंधू, जेसन होल्डर, राशिद खान, अरशद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुथार आणि राहुल तेवतिया.

Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव