Minister Pratap Sarnaik : धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’

मुंबई : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त आणि नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यभरात तब्बल ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’ (वाहतूक उद्यान) उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून प्रत्येक उद्यान सुमारे १ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे १ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


मंत्री सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ट्रॅफिक गार्डन (Traffic Garden) उभारण्यात येणार असून, बालकांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतूक नियमांचे शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. या गार्डन्समध्ये लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक तसेच छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत. (60 'Traffic Gardens' to be built in the state in the name of Dharmaveer Anand Dighe)



विशेष म्हणजे, ही ट्रॅफिक गार्डन्स केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांविषयी व्यापक जनजागृती होण्यास मोठी मदत होणार आहे. “भविष्यात जबाबदार वाहनचालक घडवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल,” असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.


या ट्रॅफिक गार्डन्समध्ये वाहन परवाना प्रशिक्षणासाठी ‘ट्रायल ट्रॅक’ची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच गर्दी नियंत्रणासाठी शाळांना वेळेनुसार प्रवेश दिला जाणार असून, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.



पर्यावरणाचा संदेश देणारे उद्यान


या उद्यानामध्ये वृक्षाची लागवड करत असताना देशभरातील दुर्मिळ वृक्षांच्या जाती निवडून तेथे लावले जाणार असून त्या वृक्षाचे पर्यावरणातील महत्व असलेली माहिती तिथे उपलब्ध केली जाणार आहे. सबब , वाहतुकीच्या नियमाबरोबरच नागरिकांना पर्यावरणाचे धडे देखील तिथे दिले जाणार आहेत. तसेच भविष्यात येणाऱ्या ई -वाहनांची प्रतिकृती आणि त्याबद्दलची माहिती या उद्यानात दिली जाणार आहे. हे उद्यान त्यामुळे अबालवृद्धांसाठी एक ज्ञान आणि विरंगुळा केंद्र म्हणून विकसित करण्यात येईल.अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.


राज्य सरकारच्या या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होणार असून, सुरक्षित आणि जबाबदार वाहतुकीकडे महाराष्ट्र आणखी एक मोठे पाऊल टाकणार असल्याची भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास