Domstic Violence : 'ओएसडी'कडून पत्नीला बेदम मारहाण; मंत्री अतुल सावे यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई : आपल्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विजय कारंडे याच्याविरोधात पत्नीने दाखल केलेली तक्रार अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी असून, अशा हीन प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला प्रशासकीय जबाबदारीत कोणतेही स्थान असणार नाही, अशी भूमिका भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी घेतली आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही सावे यांनी दिले आहेत.


&

विजय कारंडे याने आपल्या पत्नीला आणि मुलाला बॅटने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री अतुल सावे यांनी तत्काळ आपली भूमिका स्पष्ट केली. सावे म्हणाले की, "आमचे महायुती सरकार महिलांचे संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी आग्रही आहे. कौटुंबिक हिंसाचाराचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."



विजय कारंडे याने 'मी मंत्र्याचा ओएसडी आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही' अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावर सावे यांनी स्पष्ट केले की, पदाचा गैरवापर करून महिलांवर अन्याय करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. या घटनेची वेगवान चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, कायद्यानुसार कारंडे याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल.

Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा