Thalapathy Vijay : विजय थलपती यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा, राज्यपाल अर्लेकर यांच्याकडून सत्तास्थापनेचे निमंत्रण

चेन्नई: तामिळनाडूच्या सत्तासंघर्षाचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. तामिळगा वेट्री कळघम पक्षाचे प्रमुख आणि सुपरस्टार विजय थलपती यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाले असून, गुरुवारी (७ मे) त्यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी विजय यांचे सादरीकरण आणि आमदारांच्या पाठिंब्याबाबत समाधान व्यक्त करत त्यांना अधिकृतपणे सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विजय थलपती यांनी राज्यपालांना त्यांच्याकडे आवश्यक बहुमत असल्याचे आश्वासन दिले आहे. शपथविधीनंतर विधानसभेत ते सहजपणे बहुमत सिद्ध करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी बुधवारी त्यांनी टीव्हीके आणि काँग्रेसच्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली होती. तांत्रिक कारणास्तव गुरुवारी होणारा संभाव्य शपथविधी पुढे ढकलण्यात आला होता, मात्र राज्यपालांच्या हिरव्या कंदीलमुळे आता अनिश्चितता संपली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विजय यांचा भव्य शपथविधी सोहळा येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी चेन्नईमध्ये पार पडण्याची दाट शक्यता आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.



सत्तास्थापनेचा मार्ग : विजय यांच्या पक्षाला बहुमत मिळवण्यासाठी काँग्रेस (५), पीएमके (४), डावे पक्ष (सीपीआय आणि सीपीएम), आणि व्हीसीके यांसारख्या लहान पक्षांकडून पाठिंबा मिळवू शकतो. या मित्रपक्षांच्या एकत्रित पाठिंब्यामुळे विजय थलपती यांचा बहुमताचा आकडा सहजपणे ११८ च्या पुढे जाऊ शकतो. तामिळनाडू विधानसभेच्या एकूण २३४ जागांपैकी विजय थलपती यांचा 'टीव्हीके' हा १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सत्ताधारी डीएमकेला ५९ जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर एआयएडीएमकेने ४७ जागा जिंकल्या आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा युतीला ११८ या बहुमताच्या आकड्याची गरज आहे. 'टीव्हीके' कडे सध्या १०८ जागा असून, त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अजून १० जागांची आवश्यकता आहे.

Comments
Add Comment

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची

Sonia Gandhi : ‘वंदे मातरम’च्या अपमानावरून सोनिया गांधींविरोधात तक्रार दाखल

कर्नाटक : ‘वंदे मातरम’च्या अपमानावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका