Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात हवामान बदल कायम; गुरुवारी 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई : महाराष्ट्रात होणारे हवामान बदल दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. कुठे पाऊस पडतोय तर कुठे उष्णेतेचा कहर माजला आहे. हवामान विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या बातमीनुसार ७ मे ला गुरुवारी काही भागात अवकाळी पाऊस, आणि वादळी वारे येण्याची शक्यता आहे यामुळे काही जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह सर्वच जिल्ह्याना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ७२ तास हवेतील आद्रता प्रचंड वाढणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान हवामान विभागाने केले आहे.


कोकणात गेल्या काही काळापासून उष्ण आणि दमट हवामानाने नागरिक हैरान झाले आहेत. त्यामुळे कोकणात उकाडा तर राहणारच आहे शिवाय वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.



मध्य महाराष्ट्र


घाटमाथा भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवली असून, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर भागात ताशी ४० - ५० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच कमाल तापमान ३७-४० अंशाच्या दरम्यान राहणार आहे.



उत्तर महाराष्ट्र


उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा पारा चढलेलाच राहणार आहे. त्यामुळे कमाल तापमान ४०-४४ अंशापर्यंत जाणार असून, किमान २२-२६ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.



मराठवाडाचे हवामान


मराठवाड्याला पाऊस चांगलाच झोडपणार असून काही ठिकाणी उष्णतेचा पारा हा चढलेला दिसणार आहे. शिवाय मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.



विदर्भ


गेल्या काही दिवसात पावसाने विदर्भाला चांगलेच झोडपून निघालं आणि आता हे संकट हळूहळू मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर कोकणात गेलं आहे.


दरम्यान काही दिवस हे असच वातावरण महाराष्ट्रात राहणार असून, नागरिकांनी विजा आणि वादळी वाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील