DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर वादाळात अडकले आणि...

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असताना संकटात सापडले. शिंदेंचे हेलिकॉप्टर वादळात अडकले. प्रतिकूल हवामान आणि वादळाचा तडाखा शिंदेंच्या हेलिकॉप्टरला बसला. पायलटने (हेलिकॉप्टर चालक) प्रसंगावधान राखल्यामुळे एकनाथ शिंदे सुरक्षित आहेत. शिंदेंसह हेलिकॉप्टरमधील सर्वजण मुंबईत जुहू विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले आहेत. सर्वजण सुखरुप आहेत.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि मुरबाडच्या दौऱ्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स येथील हेलिपॅडवरून रवाना झाले. शिंदेंचे हेलिकॉप्टर उड्डाणानंतर थोड्याच वेळात वादळात अडकले. प्रतिकूल हवामान आणि वादळामुळे संकट निर्माण झाले. सोसाट्याचा वारा आणि खराब दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. या संकटात डोकं शांत ठेवून पायलटने (हेलिकॉप्टर चालक) थोड्याच वेळात हेलिकॉप्टर पुन्हा नियंत्रण मिळवले. संकटाचे स्वरुप लक्षात येताच पायलटने नियंत्रण कक्षाशी समन्वय राखून तांत्रिक कौशल्याचा व्यवस्थित वापर केला. हेलिकॉप्टर वादळाच्या तडाख्यातून बाहेर काढून सुरक्षितरित्या मुंबईतील जुहू विमानतळावर उतरवले. शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग झाले.







हेलिकॉप्टरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, प्रभाकर काळे (स्विय सहाय्यक), विनायक पात्रूडकर (मुख्य जनसंपर्क अधिकारी), राजपूत (OSD), मुख्य सुरक्षा अधिकारी आणि इतर कर्मचारी तसेच पायलट एवढे सगळे होते. एकूण आठ जण हेलिकॉप्टरमध्ये होते. हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग झाले. यानंतर हेलिकॉप्टरमधील आठ जण सुरक्षितरित्या हेलिकॉप्टरमधून बाहेर आले. सर्वजण सुरक्षित आणि सुखरुप आहेत. पायलटने प्रसंगावधान राखल्यामुळे एकनाथ शिंदेंचे DCM Eknath Shinde प्राण वाचले. मोठे संकट टळले. या घटनेनंतर शिंदेंच्या दौऱ्याच्या कार्यक्रमात तातडीने बदल करण्यात आला. आता उपमुख्यमंत्री शिंदे रस्ते मार्गाने ठाणे जिल्ह्यात जाणार असल्याचे वृत्त आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या