Strait of Hormuz : होर्मुझ सामुद्रधुनीतून ११ भारतीय जहाजे बाहेर, १३ जहाजे परवानगीच्या प्रतीक्षेत

नवी दिल्ली : प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, ११ भारतीय जहाजे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून यशस्वीरित्या बाहेर पडली आहेत, तर १३ जहाजे अद्याप पर्शियन गल्फमध्ये अडकलेली आहेत. या जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी भारत सरकार इराणच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करत आहे, अशी माहिती गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने दिली.


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "राजनैतिक चर्चा आणि इराणशी सुरू असलेल्या संवादामुळे ११ भारतीय जहाजे आतापर्यंत हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली आहेत. अद्याप १३ जहाजे तिथेच आहेत. ही जहाजे भारतात सुखरूप पोहोचावीत यासाठी आम्ही इराणच्या प्रशासनाच्या संपर्कात आहोत." आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात वावरण्यासाठी इतर देशांच्या जहाजांना परवानगीची गरज नसते, असेही जयस्वाल यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांसाठी नवीन नियम लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत माहिती दिली की, हॉर्मुझमधील जहाजांच्या वाहतुकीसाठी सुरू असलेली अमेरिकन लष्करी मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली आहे.



ट्रम्प यांनी म्हटले की, "पाकिस्तान आणि इतर देशांच्या विनंतीनुसार, तसेच इराणसोबतच्या करारात होत असलेली प्रगती पाहता आम्ही 'प्रोजेक्ट फ्रीडम' (जहाजांच्या हालचालींसाठीची मोहीम) काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून अंतिम करारावर स्वाक्षरी होऊ शकेल. मात्र, नाकेबंदी पूर्णपणे सुरूच राहील."



समुद्री धोक्याचा स्तर 'गंभीर' : ब्रिटनच्या 'मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स' या संस्थेने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील धोक्याचा स्तर 'गंभीर' असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या ४८ तासांत या भागात अनेक हल्ले झाले आहेत. अहवालानुसार, अमेरिकेच्या नौदलाने काल आणि आज या भागात विविध धोके परतवून लावले आहेत. या क्षेत्रात सुरुंगांचे वृत्त आणि ड्रोन हल्ल्यांचा मोठा धोका असल्याचेही सांगण्यात आले आहे.


वाहतुकीत मोठी घट : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी व्यावसायिक वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. ऐतिहासिक सरासरीनुसार दररोज १३८ जहाजे या भागातून प्रवास करतात, मात्र ४ मे रोजी ही संख्या केवळ ५, तर ३ मे रोजी ६ पर्यंत खाली आली आहे. इराणच्या नौदलाने गेल्या ४८ तासांत आक्रमक भूमिका घेतल्याने हे क्षेत्र अत्यंत धोकादायक बनले आहे.

Comments
Add Comment

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन