अटलांटा : टेड टर्नर यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले. ते सीएनएन या जगातल्या पहिल्या २४ तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिनीचे संस्थापक होते. त्यांच्या निधनाने मीडिया विश्वातील एका युगाचा अंत झाला. टेड टर्नर हे एक दूरदृष्टी असलेले व्यावसायिक होते. त्यांनी टीव्ही पत्रकारितेला नवे स्वरुप दिले. पत्रकारिता विश्वाला नवी दिशा दिली.
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ईरान-अमेरिका संघर्षात थांबण्याचे संकेत मिळू लागल्याने आंतरराष्ट्रीय ...
सीएनएनचे संस्थापक टेड टर्नर यांचे वडील बिलबोर्ड अर्थात जाहिरातींच्या फलकांची निर्मिती करणारे व्यावसायिक होते. सुरुवातीला वडिलांच्या व्यवसायात सहभागी झालेल्या टेड टर्नर यांनी १९७० च्या दशकात अटलांटामधील एक छोटे दूरदर्शन केंद्र विकत घेतले. जेव्हा टर्नर यांनी दूरदर्शन केंद्र विकत घेतले त्यावेळी ते केंद्र तोट्यात होते. पण याच केंद्राचा वापर करून उपग्रहाच्या मदतीने टर्नर यांनी वृत्तवाहिनीचे प्रसारण संपूर्ण अमेरिकेत केले. जे टर्नर ब्रॉडकास्टिंग सिस्टिम या नावाने ओळखले जात होते. त्या काळात टीव्हीवर फक्त सकाळी आणि संध्याकाळी बातम्या प्रसारित करण्याची पद्धत होती. पण टेड टर्नर यांनी १ जून १९८० पासून केबल न्यूज नेटवर्क अर्थात सीएनएन ही जगातली पहिली २४ तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी सुरू केली. या वृत्तवाहिनीने १९९१ मध्ये आखाती युद्धाचे थेट प्रसारण केले. या वार्तांकनामुळे सीएनएन जगातील सर्वात विश्वासार्ह आणि शक्तिशाली वृत्तवाहिनी झाली. या यशाने टेड टर्नर यांची भरभराट सुरू झाली. नंतर १९९७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी एक अब्ज डॉलर दान करण्याची घोषणा केल्यामुळे टेड टर्नर एकदम लोकप्रिय झाले. त्यांनी स्वतःच्या मालकीच्या शेकडो एकर भूखंडापैकी मोठा भूभाग वन्यजीव संवर्धनासाठी दिला. यातूनच बायसन (गोवंशातील एक प्राणी) संवर्धनाचा मोठा कार्यक्रम अमेरिकेत राबवला गेला.
PM Vishwakarma Yojana: सर्वसामान्या नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी ...
'अटलांटा ब्रेव्ह्स' हा बेसबॉल संघ आणि 'अटलांटा हॉक्स' हा बास्केटबॉल संघ टेड टर्नर यांच्या मालकीचा होता. या संघांच्या माध्यमातून टर्नर यांनी क्रीडा विश्वात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. कुशल खलाशीही होते, त्यांनी १९७७ मध्ये 'अमेरिकास कप' जिंकला होता. प्रगतीसाठी जोखीम स्वीकारणारा माणूस अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह जगातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. मीडिया विश्वानेही दुःख व्यक्त केले.






