Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणातील चार संशयितांना न्यायालयीन कोठडी

नाशिक : टीसीएस प्रकरणातील चौघांना संशयितांची पोलीस कोठडीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या चारही संशयितांना आज म्हणजेच बुधवार ६ मे रोजी सातव्या गुन्ह्यात पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


वारंवार मांसाहार घाण्यास भाग पाडले :


कंपनीतील एका तरुणाला वारंवार हॉटेलमध्ये नेऊन मांसाहार करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून विशेष तपास पथकाने (एसआयटी) दि. २४ एप्रिल रोजी चार संशयितांना अटक केली होती. तौसिफ बिलाल अत्तार (३७), दानिश एजाज शेख (३२), शाहरुख हुसेन शौकत कुरेशी (३४) आणि रझा रफीक मेमन (३५) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.



आरोपींचे मोबाईल व लॅपटॉप पोलिसांकडून जप्त :


तपासादरम्यान पोलिसांनी महत्त्वाचे तांत्रिक पुरावे गोळा केले असून, दानिश शेख याचा मोबाईल फोन व लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. फेस लॉक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध ऍप्स व फाईल्समधील माहिती उघड करून तपासासाठी उपयुक्त पुरावे मिळविण्यात आले आहेत. या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, या प्रकरणासह संबंधित इतर गुन्ह्यांचा तपासही वेगाने सुरू असून, संशयितांकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.



महिला आयोगाच्या अध्यक्षा नाशिक दौऱ्यावर :


या खटल्यातील प्रमूख सुत्रधार निदा खान अद्यापही फरार असून त्यांचा जामीन अर्ज न्यायलयाने फेटाळला आहे. तीचा पोलीस सखोल तपास करत आहे.या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर या भोंदू अशोक खरात प्रकरणासह टीसीएस प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी आज (दि. ६) नाशिकला भेट देणार आहेत. यावेळी त्या विशेष तपास पथकासोबत बैठक घेऊन तपासाच्या प्रगतीची माहिती घेणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक