Nashik Crime : ५० हजारांची लाच स्वीकारताना महिला मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : नाशिकमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चांदवड तालुक्यातील (Chandwad Crime ) वडाळी भोई येथे महिला मंडळ अधिकारीला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. योगिता आनंद भोये (३८) असे या चांदवड तालुक्यातील महिला मंडळ अधिकारीचे नाव असून वडिलोपार्जित जमिनीचे रेकॉर्ड व कब्जाबाबत कार्यवाही करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची (bribe) मागणी त्यांनी केली होती, जी स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) त्यांना रंगेहात पकडले आहे.



नेमकं काय घडलं ?


तक्रारदाराची खडक ओझर शिवारात वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जमिनीच्या कब्जाबाबत वाद निर्माण झाला होता त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेत न्यायालयाकडे दाद मागितली होती. न्यायालयाने तक्रारदाराला कब्जा देण्याबाबत महसूल विभागाला आदेश दिले होते. या आदेशान्वये चांदवड तहसीलदारांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करून तक्रारदाराला न्यायालयाच्या निर्णयान्वये मूळ रेकॉर्ड व कब्जा देण्याबाबत वडाळी भोईच्या मंडळ अधिकारी योगिता भोई यांना आदेशित केले होते. (Chandwad Crime )


या आदेशान्वये कारवाई करून तक्रारदाराला रेकॉर्ड व कब्जाबाबत कार्यवाही करण्याच्या मोबदल्यात भोई यांनी स्वतासाठी तसेच सजा खडक ओझर येथील तलाठी यांच्या नावाने ६० हजार रुपयांची (bribe) मागणी केली. तडजोडीअंती ५० हजार रुपये निश्चित करण्यात आले. लाचेची ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) पथकाने भोये यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात (Vadner Bhairav ​​Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून न्यायालयाचे आदेशाचे अशाप्रकारे लाच घेऊन उल्लंघन झाल्याने एकच चर्चा रंगली आहे. शासकीय कार्यालयात कुठल्याही कामासाठी अधिकारी वा कर्मचारी अथवा त्यांच्यावतीने कुणी लाच मागत असल्यास तसेच भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (Anti-Corruption Department)  १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ०२५३-२५७५६२८, २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान ही यशस्वी ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक भारत तांगडे, अपर अधिक्षक माधव रेड्डी व सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी काम पाहिले. पथकात पोलीस हवालदार विनोद चौधरी, कॉन्टेबल अनिल गांगोडे व हवालदार प्रमोद चव्हाणके यांचा समावेश होता.

Comments
Add Comment

Indian Idol 16 : ज्योतिर्मयी नायक ठरली इंडियन आयडल 16 ची विजेती!

मुंबई : लोकप्रिय गायन रिअॅलिटी शो (Reality Show) 'इंडियन आयडल १६' (Indian Idol 16) ला अखेर विजेती (Winner) मिळाली आहे. तब्बल १० महिन्यांच्या

Kushal Badrike In MHJ : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कुशल बद्रिकेची धमाकेदार एन्ट्री; दत्तू मोरेसोबत रंगणार हसण्याचा डबल डोस!

मुंबई : मराठी प्रेक्षकांचा लाडका विनोदवीर कुशल बद्रिके पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर हास्याचा जल्लोष घेऊन येत

NTA : पेपरफुटीवर केंद्राचा 'मास्टरप्लॅन'! NTA साठी 'सुपर 6' समितीची नियुक्ती

पेपर लीकवर केंद्राचा मोठा प्रहार! दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटींपर्यंत दंड; संसदेत सोमवारी

Mayank Yadav : मयंक यादवची विक्रमी गोलंदाजी! पहिल्याच चेंडूवर विकेट!

भारताचा युवा वेगवान (Fast Bowler) गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) दुखापतीतून (Injury) पुनरागमन (Comeback) केल्यानंतर दमदार लयीत दिसत आहे.

Shivsena : राजकीय भूकंप! उबाठा गटाला आणखी एक धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

- अहिल्यानगर, पुणे, नांदेडमधील शेकडो पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत मुंबई : राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत

Pune News : "माझं लग्न थांबवा"... १७ वर्षीय मुलीच्या एका कॉलने उघड केला मोठा बनाव

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात (Khed Taluka) बालविवाह (Child Marriage) रोखण्यात एका १७ वर्षीय अल्पवयीन (Minor) मुलीच्या