IIT Mumbai : आयआयटी मुंबईच्या परिसरात इमारत बाधकामांमध्ये बाधित २३७ झाडे कापली, तर ४०० झाडे केली पुनर्रोपित

- ड्रोन सेंटर सर्व्हिस ब्लॉकच्या बांधकामांमध्ये आणखी ५४ झाडे बाधित


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईतील पवई येथील आयआटी परिसरात मागील काही चार वर्षांत हॉस्टेल, सीओपीटी आदींची कामे करण्यात आली असून सन २०२२पासून या सर्व इमारतींच्या बांधकामांमध्ये बाधित झाडांपैंकी २३७ झाडे कापणे तसेच ४०० झाडे पुनर्रोपित करण्याच्या प्रस्तावांना प्रशासक काळामध्ये मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुनर्रोपित करण्यात येणाऱ्या ४०० झाडांपैंकी १८२ झाडे मृत पावली आहे तर २०४ झाडेच जगली आहे. त्यात आता आणखीत आणखी एका इमारतीच्या बांधकामांमध्ये २५२ झाडांपैंकी ५४ झाडे बाधित होत असून त्यातील ३१ झाडे कापली जाणार आहेत, तर २३ झाडे पुनर्रोपित केली जाणार असून याबाबतचा प्रस्ताव आता वृक्ष प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.



पवईतील पासपोलीस गावचा नगर भू क्रमांक ६८ प्लॉट बी या भूभागावर भारतीय प्रौद्योगिकी संस्थान,मुंबई यांच्याकरता प्रस्तावित शैक्षणिक इमारतीच्या अर्थात ड्रोन सेंटर सर्व्हिस ब्लॉक बांधकामांमध्ये बाधित वृक्षांची कापणी आणि पुनर्रोपण करण्यास परवानगी मागण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या समोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी २५२ झाडे असून त्यातील ५४ झाडे ही बाधित होत आहे. त्यातील ३१ झाडे कापली जाण्यास आणि २३ झाडे पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव मंजुरीला प्लानोस्केप्स आर्किटेक्ट आणि प्लानर्स यांच्याकडून महापालिकेच्या उद्यान विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यानुसार उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांसह केलेल्या पाहणीमध्ये बाधित झाडे कापण्यास आणि पुनर्रोपित करण्यात येणाऱ्या झाडांचा संख्या ठरवण्यात आली आहे.



विशेष म्हणजे या आयआयटीच्या परिसरात सीओपीटी, डिएसएससी सह आठ हॉस्टेल इमारती तसेच एस अँड आर पार्क अशा इमारतींच्या बांधकामांचा प्रस्ताव ऑगस्ट २०२२पासून सादर करण्यात येत आहे. प्रशासकांच्या काळात ११ प्रस्तावांमध्ये २३७ झाडे कापण्यास आणि ४०० झाडे पुनर्रोपित करण्यास मंजूरी देण्यात आली होती. तर तीन प्रस्तावांमध्ये झाडे कापण्यास आणि पुनर्रोपित करण्यास मंजुरी दिल्यानंतर त्या बदल्यात ९१५ झाडे लावण्यात आल्याचे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे