BMC News : महापालिकेच्या रुग्णालयांमधील स्वच्छता खासगी कंपनीमार्फत!

- स्थायी समितीच्या मंजुरीपूर्वीच कामाला केली सुरुवात


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायरसह उपनगरातील चार रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी आता तीन वर्षांकरता खासगी संस्थेची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व रुग्णालयांसाठी केवळ एकाच संस्थेला काम देण्यात आले असून स्थायी समितीची मान्यता नसतानाही मार्च पासून प्रत्यक्षात या संस्थेच्या माध्यमातून कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी प्रशासन आजही प्रशासकाच्या काळात असल्यासारखे वावरत आहे. त्यामुळे भाजप आता या महापालिकेच्या रुग्णालयांमधील स्वच्छतेच्या कामांमधील प्रशासनाचा हा 'ऑरा ' उतरवणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.



मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायर, नायर दंत, कुपर, जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटर, बोरीवली भगवती तसेच मुलुंड एम.टी.अगरवाल या रुग्णालयांतील स्वच्छता राखण्यासाठी निविदा मागवली आहे. यामध्ये यासर्व रुग्णालयांमधील स्वच्छतेसाठी ऑरा एफएमएस लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे. आठही रुग्णालयांमध्ये या एकाच कंपनीच्या माध्यमातून काम केले जाणार असून प्रत्येक चौरस फुटांसाठी प्रत्येक रुग्णालयासाठी मासिक सहा ते सात रुपये एवढा दर निश्चित करण्यात आला आहे. यासाठी तीन वर्षांकरता सुमारे १०१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.



विशेष म्हणजे ऑरा या कंपनीला हे काम देताना याला स्थायी समितीची मान्यता घेणे आवश्यक असते आणि समितीच्या मान्यतेनंतर संबंधित कंपनीला काम करण्यास कार्यादेश बजावला जातो. परंतु या कामांसाठी निविदा अंतिम झाल्यानंतर प्रशासनाने समितीच्या मान्यतेआधीच संबंधित कंपनीला काम सुरु करण्यास परवानगी दिली. ज्यामुळे समितीच्या मान्यतेपूर्वीच रुग्णालयांमध्ये या कामाला सुरुवात झाली असून आता याबाबतचा प्रस्ताव समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन अजूनही प्रशासकाच्या भूमिकेतून बाहेर आलेले नसून या एकाच कंपनीची सर्व रुग्णालयासाठी निवड करून त्यांना परस्पर कामे सुरु करण्यास परवानगी देणाऱ्या प्रशासनाविरोधात समिती काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे