सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या 'हिंदी' परीक्षेला स्थगिती

मुंबई : राज्य शासनाच्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेची परीक्षा देण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु, यावरून पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरु झाल्याने अखेर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली.



राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाने राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. दि. २८ जून रोजी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ही परीक्षा होणार होती. परंतु, मनसे आणि इतर संघटनांनी या निर्णयाला विरोध केला होता. मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या डॉ. दीपक पवार यांनीही यास विरोध केला होता. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.


याबबात बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, "सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीची हिंदी भाषेची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत मी विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा केली असून या परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. भविष्यात हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का, हे पडताळून बघणार आहे. आवश्यकता नसल्यास हिंदीची परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. १९७६ च्या नियमावलीनुसार दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. आता या परीक्षेची आवश्यकता आहे की, नाही हे पडताळून त्याबाबतचा निर्णय घेऊ."

Comments
Add Comment

Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग आरपीएफची 'ऑपरेशन नारकोस 'अंतर्गत मोठी कारवाई, १० लाखांचा गांजा जप्त

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) "ऑपरेशन नारकोस" अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर

Mangalagaur 2026 : आजपासून मंगळागौरला सुरूवात...जाणून घ्या शुभ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत अन् पौराणिक कथा!

श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीचे आगमन श्रावण महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात सणांची

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच