Pune Nasrapur Bhor Crime : नसरापूर प्रकरणात संतापजनक खुलासा! शवविच्छेदन अहवालातून समोर आले धक्कादायक तपशील

पुणे : पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील नवीन माहिती समोर आल्यानंतर जनतेत संतापाची लाट अधिक तीव्र झाली आहे.


शवविच्छेदन अहवालातून अत्यंत धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. आरोपीने अत्याचारानंतर मुलीच्या तोंडात पायमोजा कोंबल्याचे आणि तिच्या छातीवर वळ उमटल्याचे स्पष्ट झाले आहे. हे निरीक्षण शवविच्छेदनावेळी नोंदवण्यात आले असून, पीडितेवर किती क्रूरता करण्यात आली होती याची कल्पना यावरून येते.



हा प्राथमिक अहवाल ससून सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे सादर केला आहे. दरम्यान, आरोपीचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पोलिसांकडून सर्व पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. लवकरच आरोपपत्र दाखल करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले जाण्याची शक्यता आहे.



नेमकी घटना काय ?


घटनेचा तपशील पाहता, १ मे रोजी सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली ४ वर्षांची मुलगी अंगणात खेळत असताना एका ६५ वर्षीय नराधमाने वासरू दाखवण्याच्या नादात तिला गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून दिला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.


सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.



आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील : मुख्यमंत्री


दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पीडित कुटुंबाशी संवाद साधला असून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे. त्यांनी प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी न्यायालयाशी समन्वय साधला जात असल्याचेही स्पष्ट केले आहे.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून समाजात तीव्र संताप आणि वेदना व्यक्त केल्या जात आहेत.

Comments
Add Comment

Jalgaon Crime News : खाऊचे आमिष अन् अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार ; चार संशयितांना अटक

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून

Ahilyanagar : हृदयद्रावक ! भीषण अपघातात उद्योजकासह दोघांचा जागीच मृत्यू ; परिसरात हळहळ

Ahilyanagar : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ मंगळवारी भीषण अपघाताची घटना घडली. मंगळवारी सायंकाळी कंटेनर,

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात