Census 2027 : जनगणना २०२७ च्या नावाखाली फसवणूक? बनावट अर्ज व्हायरल; प्रशासनाचा इशारा

मुंबई : जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, हा अर्ज पूर्णपणे बनावट आणि अनधिकृत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या लिंक किंवा अर्जांपासून दूर राहावे, असे ठाम आवाहन करण्यात आले आहे. (Census 2027)


प्रशासनाच्या माहितीनुसार, जनगणना प्रक्रियेसाठी कोणतीही माहिती केवळ अधिकृत माध्यमांद्वारेच सादर करायची आहे. यासाठी नागरिकांसमोर दोन अधिकृत पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिला पर्याय म्हणजे स्व-नोंदणी (Self Enumeration). या अंतर्गत नागरिक अधिकृत संकेतस्थळ https://se.census.gov.in वर जाऊन ३३ अधिसूचित प्रश्नांची अचूक माहिती भरू शकतात. फॉर्म पूर्ण केल्यानंतर नागरिकांना ‘SE ID’ मिळणार असून, पुढील टप्प्यात प्रगणक घरभेटीदरम्यान याची पडताळणी करणार आहेत.



दुसरा पर्याय म्हणजे प्रत्यक्ष माहिती देण्याचा. दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत अधिकृत प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन माहिती संकलित करतील. या भेटीदरम्यान नागरिकांनी योग्य आणि खरी माहिती देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.


दरम्यान, काही फसवणूक करणारे घटक सोशल मीडियावर बनावट फॉर्म, लिंक आणि अर्ज शेअर करून नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः बँक तपशील, आधार क्रमांक किंवा मोबाईल OTP सारखी संवेदनशील माहिती मागितली जात असल्यास ती देणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


तसेच, अधिकृत प्रगणकांची ओळख पटवूनच माहिती द्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. प्रगणकांकडे अधिकृत ओळखपत्र असणार असून नागरिकांनी ते तपासूनच प्रतिसाद द्यावा.



प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद लिंक किंवा अर्जाबाबत त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्याचे आवाहन केले आहे. “केवळ अधिकृत संकेतस्थळ आणि अधिकृत प्रतिनिधींवरच विश्वास ठेवा,” असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.


जनगणना ही देशाच्या नियोजन आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने सहभाग नोंदवावा, तसेच अफवा आणि फसवणुकीपासून दूर राहावे, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.


Comments
Add Comment

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न

CM Devendra Fadnavis : शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार

Tragedy in Chhatrapati Sambhajinagar : मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील दुर्घटनेने हळहळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. मोबाईल

CM Devendra Fadnavis : केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी खर्चात शालेय शिक्षण विभाग अव्वल

- ९६ टक्के निधीचा विनियोग; कृषी, ग्रामीण विकास आणि महिला-बाल विकास विभागांचीही उल्लेखनीय कामगिरी मुंबई : केंद्र

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय! ३७४ हेक्टर जमिनीवरील ‘महाराष्ट्र शासन राखीव वने’ नोंद कायम

ठाणे : भाईंदरपाडा (ओवळे) येथील तब्बल ३७४ हेक्टर ७९ आर वनजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात

CM Devendra Fadnavis : ‘सीएसआर’ निधीच्या वापरासाठी राज्यात स्थापन होणार ‘महा सीएसआर प्राधिकरण’

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणार मुंबई : महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक