Jalgaon Heatwave : जळगाव उष्णतेच्या तडाख्याने केळी बागांचे नुकसान

जळगाव : यावल तालुक्यातील डांभुर्णी परिसरात वाढत्या तापमानामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असल्याने केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः धावपळ करावी लागत आहे. प्रखर उन्हामुळे झाडे करपत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यावल तालुक्यातील हा परिसर तालुक्यातील बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. विशेषतः केळी शेतीवर येथील अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, सध्याच्या तीव्र उष्णतेमुळे केळी बागांचे संरक्षण करणे आव्हानात्मक बनले आहे. पाण्याची कमतरता आणि योग्य वेळी सिंचन न झाल्याने झाडांची स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे.



शेतकऱ्यांना आता सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा शेतीची कामे उरकावी लागत आहेत. दिवसभरातील कडक उन्हामुळे शेतात काम करणे कठीण झाले आहे. त्यातच मजुरांची टंचाई असल्याने शेती कामे वेळेत पूर्ण होत नसल्याची तक्रारही शेतकरी व्यक्त करत आहेत. रब्बी हंगामात काही प्रमाणात उत्पादन मिळूनही आर्थिक स्थिती सुधारलेली नसल्याने खरीप हंगामाची तयारी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.



दरम्यान, बाजारात केळीच्या भावात वाढ झाल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात व्यापाऱ्यांकडून केळी कमी दरात खरेदी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला मिळत नसून आर्थिक अडचणी अधिकच वाढत आहेत. या सर्व समस्यांमध्ये भर म्हणजे वीज पुरवठ्याचे विस्कळीत वेळापत्रक. शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास दिली जात असल्याने मोठी गैरसोय होत आहे. रात्री २.३० ते सकाळी १०.३० आणि दिवसा १०.३० ते सायंकाळी ५.३० अशा वेळेत वीज पुरवठा केला जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांना रात्री जागून शेतीची कामे करावी लागत असून त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.केळी बागा वाचवण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र मेहनत घेत असताना, वीज पुरवठ्याच्या वेळेत तातडीने बदल करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०