Monday, May 4, 2026

puducherry : पुदुच्चेरीत पुन्हा एनडीएचीच सत्ता, एन. रंगस्वामी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार

puducherry : पुदुच्चेरीत पुन्हा एनडीएचीच सत्ता, एन. रंगस्वामी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार

पुदुच्चेरी : पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या ३० जागा असलेल्या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात ८१ टक्के मतदान झाले. या राज्यात सध्या एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात भाजपची युती सत्तेत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचा कौल पुन्हा एकदा याच युतीला मिळताना दिसत आहे.

पुदुच्चेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस सहा जागांवर जिंकली असून तीन जागांवर आघाडी आहे. भाजप एका जागेवर जिंकली असून एका जागेवर आघाडीवर आहे. यामुळे एआयएनआरसी आणि भाजप युती ११ जागांवर विजयी वा आघाडीवर असल्याचे दिसत आहे. या व्यतिरिक्त एक अपक्ष विजयी झाला असून दोन अपक्ष आघाडीवर आहेत. काँग्रेस एका जागेवर विजयी झाली आहे. एडीएमके एका जागेवर जिंकली आहे. आतापर्यंत ज्या १६ जागांचे निकाल हाती आले आहेत त्यात सत्ताधारी युती आघाडीवर दिसत आहे. यामुळे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी पुन्हा एकदा सत्तेत येण्याची चिन्हं दिसत आहेत.

Comments
Add Comment