West Bengal : पश्चिम बंगालमध्ये भाजपची एकहाती सत्ता, ममता बॅनर्जींचा विधानसभा निवडणुकीत पराभव

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपची एकहाती सत्ता स्थापन होणार आहे तर आसाम आणि पुदुच्चेरीत एनडीएची सत्ता स्थापन होणार आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. शुभेंदू अधिकारी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांना ७३ हजार ९१७ मते मिळाली तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या ममता बॅनर्जी यांना ५८ हजार ८१२ मते मिळाली. सुवेंदू अधिकारी यांनी ममतांच्या विरोधातील निवडणूक १५ हजार १०५ मतांनी जिंकली. तब्बल २० फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर अधिकारी यांनी निवडणूक जिंकली.



निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालांनुसार पश्चिम बंगालमध्ये २९४ पैकी २९२ जागांचे कल आणि निकाल जाहीर झाले आहेत. भाजपने १८२ जागा जिंकल्या असून २५ जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी आवश्यक १४७ चा आकडा पार केल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपची एकहाती सत्ता स्थापन होणार आहे. आसामच्या १२६ पैकी १२४ जागांचे कल आणि निकाल जाहीर झाले आहेत. भाजपने ८१ जागा जिंकल्या असून एका जागेवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसने १८ जागा जिंकल्या आणि एका जागेवर आघाडी घेतली आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंट आणि आसाम गण परिषद यांनी प्रत्येकी १० तर ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि रायजोर दलने प्रत्येकी २ जागा जिंकल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. आसाममध्ये एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. तसेच पुदुच्चेरीत ३० पैकी २९ जागांचे कल आणि निकाल जाहीर झाले आहेत. ऑल इंडिया एनआर काँग्रेसने ११ जागा जिंकल्या असून एका जागेवर आघाडी घेतली आहे. द्रमुकने पाच जागा जिंकल्या आहेत. भाजपने चार जागा जिंकल्या आहेत. टीव्हीकेने दोन तर काँग्रेस, लाचिया जननायक कच्ची, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम, एनवायएमके यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. या व्यतिरिक्त तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. पुदुच्चेरीतही एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे.



केरळमध्ये सर्व १४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. काँग्रेसने ६३, सीपीआयएमने २६, आययूएमएलने २२, सीपीआयने ८, केईसीने ७, आरएसपीने ३, भाजपने ३, आरजेडीने १, आरएमपीओआयने १, केरळ काँग्रेस (जेकब)ने १, कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष केरळ राज्य समितीने १ जागा जिंकली. याव्यतिरिक्त चार अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



तामिळनाडूत सर्व २३४ जागांचे कल आणि निकाल जाहीर झाले आहेत. तमिलगा वेत्री कळघमने ९६ जागा जिंकल्या आणि ११ जागांवर आघाडी घेतली आहे. यामुळे तमिलगा वेत्री कळघमच्या नेतृत्वात तामिळनाडूत सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुकने ५४ जागा जिंकल्या असून ६ जागांवर आघाडी घेतली आहे. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमने ४४ जागा जिंकल्या आणि ३ जागांव आघाडी घेतली आहे. काँग्रेसने ५ जागा जिंकल्या आहेत. पीएमकेने २ जागा जिंकल्या आणि २ जागांवर आघाडी घेतली आहे. आययूएमएलने २ जागा जिंकल्या आहेत. सीपीआय, विदुथलाई चिरुथाईगल कच्ची, सीपीआयएम यांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. भाजप, देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम आणि अम्मा मक्कल मुनेत्र कझागम यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना जीवे

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

Shaina NC : मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करा; शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांची मागणी

- चेंबूरमधील झाड पडून झालेल्या दुर्घटनेतील ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का! निकटवर्तीय चंद्रिमा भट्टाचार्यांचा टीएमसीतील सर्व पदांचा राजीनामा; बंगालच्या राजकारणात खळबळ

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अडचणीत सापडलेल्या

Vaibhav Suryavanshi Debut : भारतीय संघात अखेर 'वैभव' पर्व सुरु! १५ व्या वर्षात पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू

- सचिन तेंडुलकर आणि स्मृती मंधानाला मागे टाकत रचला इतिहास भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच