कुंभमेळ्यात भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध : मंत्री गिरीश महाजन ; त्र्यंबकेश्वर येथे ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा संपन्न

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर (Nashik Simhastha Kumbh Mela) त्र्यंबकेश्वर येथे विविध पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत असून, भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. कुशावर्त तीर्थ येथे ३१ फुटी अमृतमंथन ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. या ध्वजस्तंभांवर समुद्रमंथनाशी संबंधित धार्मिक व सांस्कृतिक प्रतीकात्मक कोरीव काम केले जाणार आहे. हा ध्वज पुढील अनेक पिढ्यांच्या मनात सनातन धर्माचा स्वाभिमानी विचार पेरणारा ठरेल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.(Girish Mahajan)


जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते शिलान्यास करण्यात आला. कुशावर्त तीर्थ येथे हा समारंभ पार पडला. त्यावेळी मंत्री श्री महाजन बोलत होते. (Nashik Simhastha Kumbh Mela)


यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरीजी महाराज, महामंत्री हरिगिरीजी महाराज, तसेच आनंद आखाड्याचे प्रमुख शंकरानंद सरस्वती, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता निलेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, राहुल पाटील, कार्यकारी अभियंता वैभव भागवत (पालखेड), तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. कुशावर्त तीर्थावर ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा वैदिक मंत्रोच्चारात व भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय आखाडा परिषद व पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने करण्यात आले. यात जुना आखाडा, निरंजनी आखाडा, महानिर्वाणी आखाडा, आनंद आखाडा, आवाहन आखाडा, अटल आखाडा, बड़ा उदासीन आखाडा, नया उदासीन आखाडा, निर्मल आखाडा आदींचा सहभाग होता.


 
Comments
Add Comment

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Antara Banerjee : अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये आरपीएफ जवानांवर केला रेझरने हल्ला

मुंबई : मॉडेल आणि वेब सिरीज अभिनेत्री अंतरा बॅनर्जी (३१) हिला १२ ऑगस्ट रोजी अरवली एक्सप्रेसमध्ये जागेचे आरक्षण

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष