Workers Day : कामगार दिनानिमित्त महापालिका सफाई कामगारांचा गौरव महापालिकेचा डी विभागाने घेतला पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग, घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या वतीने एक प्रेरणादायी आणि अभिनव उपक्रम राबविण्यात आला. मुंबईतील महापलिकेच्या २४ विभागांपैकी प्रथमच डी विभागाने आपल्या सर्व कामगारांना या कामगार दिनाच्या औचित्य साधून “गुण गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित केले. भवन्स कॉलेजच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात घनकचरा विभागातील सर्व कामगारांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या परिश्रमाची व सेवाभावाची दखल घेण्यात आली.



घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार हे मुंबई शहराच्या स्वच्छतेचे खरे शिल्पकार असून, त्यांच्या अथक परिश्रमामुळेच शहर स्वच्छ व सुंदर राहते. यामुळे सफाई कामगारांप्रती असलेल्या आदरयुक्त भावनेने याची दखल घेण्यासाठी आणि त्यांना यानिमित्त गौरवीत करण्यासाठी या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन डी विभागाचे सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक नरेश राठोड यांच्या संकल्पनेतून साकार झाले असून, व सहाय्यक अभियंता अमित गाडेकर, निखिल परब,राकेश गिरी व प्रदिप वाकडे च्या सहाय्याने यामुळे कामगारांमध्ये नवचैतन्य व प्रेरणा निर्माण झाली आहे.



या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच नगरसेवक अजय पाटील, सन्नी सानप, गौरांग जवेरी, संतोष ढाले व स्नेहल तेंडुलकर तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कामगार हे मुंबई शहराच्या स्वच्छतेचे खरे शिल्पकार असून, त्यांच्या अथक परिश्रमामुळेच शहर स्वच्छ व सुंदर राहते. अशा सन्मान सोहळ्यांमुळे त्यांच्या कार्याला योग्य ती दखल मिळत असून, ते अधिक उत्साहाने आपली सेवा बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला

Comments
Add Comment

Ladakh Earthquake : लडाखमध्ये पहाटेच भूकंपाचा जोरदार धक्का! लेहमध्ये ५.५ रिश्टर स्केलचे हादरे, नागरिकांमध्ये घबराट

लेह : लडाखमधील लेह शहराला गुरुवारी पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सकाळी सुमारे ६ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक