BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश


मुंबई : रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. ही कामे पावसाळ्याच्या आधी पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. असे असले तरी, कामांचा वेग वाढवताना रस्त्यांच्या बांधकामात आणि दर्जा राखण्यात कोणतीही हयगय व्हायला नको. कामे पूर्ण झालेले रस्ते आणि त्यांच्या पाणी निचरा करणाऱ्या नलिका व्यवस्थित स्वच्छ करून घ्याव्यात. जेणेकरून, सिमेंट मिश्रीत पाणी जाऊन नलिकांमध्ये अडथळा निर्माण होणार नाही. रस्त्याच्या कडेला पाणी साचता कामा नये असे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. तसेच गाळ काढण्याच्या कामात गती आणावी आणि पावसाळ्यापूर्वी सर्व नाले गाळमुक्त होतील, हे सुनिश्चित करावे.असेही निर्देश दिले आहेत.


मुंबई महापालिकेच्या मागील बारा दिवसांच्या अर्थसंकल्पीय चर्चेमुळे सभागृहातच अडकून पडलेल्या महापौरांनी आता रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या अर्थसंकल्पीय चर्चेमुळे महापौर व्यस्त झाल्या होत्या. आणि सकाळपासून रात्रीपर्यंत चर्चेत सहभाग नोंदवण्यासाठी नगरसेवकांना उपस्थित राहावे लागत असल्याने त्यांना आपल्या प्रभागाकडे लक्ष देता येत नव्हते. त्यामुळे ते त्रस्त ही झाले होते. आता या अर्थसंकल्पीय चर्चेला पूर्णविराम मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा महापौर आणि नगरसेवक हे आपल्या प्रभागात व्यस्त होताना दिसत आहेत.



चेंबूरमधील रस्ते कॉंक्रिटीकरण तसेच माहूल नाला, जे. के नाला आणि मिठी नदी येथील गाळ उपसा कामांची महापौर रितू तावडे यांनी शनिवारी २ मे २०२६ रोजी सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.‘एम पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्ष आशा मराठे, एल प्रभाग समिती अध्यक्ष विजयेंद्र शिंदे, एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष मानसी सातमकर, नगरसेविका साक्षी कनोजिया, नगरसेविका कशीश फुलवारिया, उपआयुक्त (परिमंडळ ५) संध्या नांदेडकर, सहायक आयुक्त (एम पश्चिम विभाग) शंकर भोसले, सहायक आयुक्त (एल विभाग) धनाजी हेर्लेकर, प्रमुख अभियंता (रस्ते) मंतय्या स्वामी, उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) सुनील रसाळ, सुनील कर्जतकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


महापौर रितू तावडे यांनी सुरूवातीला एम पूर्व विभागातील चेंबूर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरातील मार्ग क्रमांक २१ आणि ११ या रस्त्यांची पाहणी केली. रस्त्याच्या कामाचा दर्जा, विविध उपयोगिता वाहिन्यांची स्थिती, रस्त्यालगतची झाडे, पाणी निचरा होण्याची व्यवस्था यांची महापौरांनी अत्यंत बारकाईने पाहणी केली. तसेच, पदपथाच्या बांधकामाचा दर्जा तपासण्यासाठी त्यात समाविष्ट सिमेंट, काँक्रिटिकरण, त्यात वापरलेले लोखंड, जाळ्या आदी पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रत्यक्ष मूलभूत चाचणी (कोअर ट्रायल पीट) करून घेतली.



या दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर तावडे म्हणाल्या की, मुंबईतील पावसाळापूर्व कामे गतीने सुरू आहेत. पण , ही कामे योग्यप्रकारे आणि वेळेवर पूर्ण होईपर्यंत सातत्याने रस्ते काँक्रिटीकरण, नाल्यांमधून गाळ उपसा आणि इतरही कामांची पाहणी करणार आहे, असे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सांगितले. तसेच, रस्ते, नाले आणि पाणी याबाबत अत्यंत दक्षतेने काम करावे, असे निर्देश महापौर तावडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.सिमेंट काँक्रिटमुळे एकही वृक्ष बाधित होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश तावडे यांनी यावेळी दिले.


दरम्यान, चेंबूर येथील रस्त्यांची पाहणी करतेवेळी स्थानिक नागरिकांशीही महापौरांनी संवाद साधला. रस्त्यांच्या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले तसेच महापौर, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला धन्यवाद दिले.


रस्ते कामाच्या पाहणीनंतर महापौर तावडे यांनी ‘एल’ विभागातील माहूल नाला, ‘एफ उत्तर’ विभागातील जे. के. केमिकल नाला आणि मिठी नदी या तिन्ही ठिकाणी गाळ उपसा कामांची पाहणी केली. याबाबत बाबत त्या म्हणाल्या की, या वर्षी नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी ८.२८ लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. १ मे २०२६ पर्यंत यापैकी सुमारे ४५ टक्के अर्थात ३.७६ लाख मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. गाळ काढण्याच्या कामात गती आणावी आणि पावसाळ्यापूर्वी सर्व नाले गाळमुक्त होतील, हे सुनिश्चित करावे. आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांलगत संरक्षक भिंती बांधाव्यात. नाले स्वच्छतेची वास्तविक कामांची स्थिती प्रशासनासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधीना पाहता यावी, यासाठी सीसीटीव्ही मॉनिटरिंग सुविधा उपलब्ध करून द्यावी. गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची चाके धुवूनच ते रस्त्यांवरून धावतील, हे निश्चित करावे. जेणेकरून, रस्त्यांवर गाळ पडून अस्वच्छता होणार नाही, असे निर्देशही तावडे यांनी दिले.

Comments
Add Comment

Independence Day 2026 : महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष! जाणून घ्या मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत कुठे कोण फडकवणार तिरंगा?

मुंबई : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

Pratap Sarnaik : एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

१ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी; ६४ लाखांहून अधिक कार्डे

Mumbai Rain Update : मुंबईत आज पुन्हा पावसाचा जोर वाढणार! शहर-उपनगरात मध्यम सरी, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, आजही शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम

Vakola Unauthorized Shops : वाकोलातील पदपथांवरील ३७ अनधिकृत दुकानांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

Har Ghar Tiranga : प्रत्येक विभागात निघणाऱ्या तिरंगा रॅलीत मुंबईकरांनी सहभागी व्हावे

- मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक

Mumbai Water Cut : मुंबईकरांवरील कपात कायम, पण जलतरण तलावांचा पाणी पुरवठा पूर्वव्रत

- तलावांमधील पाणी अद्यापही ९० टक्क्यांच्या पुढे जाईना मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा