Breaking News : धक्कादायक! ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर

पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले आहे.



नेमकं प्रकरण काय ?


प्राथमिक माहितीनुसार, सुमारे ६५ वर्षीय आरोपीने घरासमोर खेळत असलेल्या एका ४ वर्षांच्या चिमुकलीला गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली. आपला गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. दुपारपासून मुलगी दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती गोठ्यात मृत अवस्थेत आढळून आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी मुलीला त्या दिशेने नेत असल्याचे दिसून आले आणि हा सगळा प्रकार उघड झाला. संबंधित चिमुकली सुट्टीसाठी आजीकडे आली होती, अशी माहिती स्थानिकांनी यावेळी दिली.



पोक्सो (POCSO) कायद्यासह खुनाचा गंभीर गुन्हा दाखल :


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो (POCSO) कायद्यासह खुनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे, तसेच घटनेमागील सर्व पैलूंचा तपास केला जात आहे.



संपूर्ण गावात संतापाची लाट :


या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली. संतप्त ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर ठेवत निषेध व्यक्त केला आणि रास्ता रोको आंदोलन सुरू केले. “आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी” अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.



दरम्यान, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, दोषीवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

Comments
Add Comment

Crime News : धुळे जिल्हा परिषदेचा फिटर खासगी एजंटसह जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Crime News : जळगाव एसीबीकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्यासह

Nagpur Accident News : नागपुरात भीषण अपघात; ट्रकची कारला धडक, 11वीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

नागपूर : नागपूरच्या कलमाना परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 11वीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा

Jalgaon Crime News : खाऊचे आमिष अन् अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार ; चार संशयितांना अटक

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून

Ahilyanagar : हृदयद्रावक ! भीषण अपघातात उद्योजकासह दोघांचा जागीच मृत्यू ; परिसरात हळहळ

Ahilyanagar : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ मंगळवारी भीषण अपघाताची घटना घडली. मंगळवारी सायंकाळी कंटेनर,

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री