Mumbai News : कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे गेले संपूर्ण कुटुंबाचे प्राण; फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर

मुंबई : पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुंबई हादरली होती. सुरुवातीला कलिंगड खाल्ल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता समोर आलेल्या फॉरेन्सिक अहवालामुळे या प्रकरणाला पूर्णपणे नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे.


फॉरेन्सिक तपासणीत मृतांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांमध्ये असामान्य बदल दिसून आले आहेत. मेंदू, हृदय आणि आतडी यांचा रंग बदलून हिरवट झाल्याचे निदर्शनास आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, असा बदल सामान्य अन्नविषबाधेत दिसत नाही आणि हा अत्यंत विषारी रासायनिक घटकाचा परिणाम असू शकतो. मात्र या अहवालाला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.



याशिवाय, मृतांपैकी अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन या शक्तिशाली वेदनाशामक औषधाचे अंश आढळल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मॉर्फिन हे साधारणतः कॅन्सर किंवा शस्त्रक्रियेनंतर तीव्र वेदना कमी करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. त्यामुळे एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या शरीरात हे औषध कसे आले, याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


सुरुवातीला कलिंगडामुळे झालेल्या विषबाधेचा संशय होता, मात्र मॉर्फिनचा शोध लागल्यानंतर हा अपघात आहे की घातपात, याबाबत पोलिसांचा संशय अधिक गडद झाला आहे. पोलिसांनी आता कलिंगड विक्रेता, अन्न सेवनाचा तपशील तसेच कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास या सर्व बाजूंचा सखोल तपास सुरू केला आहे.


दरम्यान, फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या अंतर्गत अवयवांच्या रंगबदलावर तज्ज्ञांकडून अधिक अभ्यास सुरू आहे. प्राथमिक निष्कर्षांनुसार, हे प्रकरण साध्या अन्नविषबाधेपेक्षा अधिक गुंतागुंतीचे असल्याचे दिसून येत आहे.



या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तपास यंत्रणांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. पोलिस आता या प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासत असून लवकरच सत्य समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक