नाशिक : विभागीय आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने ३५ कोटींची वर्कआॅर्डर, कुंभमेळा कामांत मोठा घोटाळा समोर

नाशिक - नाशिक व श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यानिमित्त विविध विकासकामे वेगात सुरू असताना, चक्क नाशिक विभागीय आयुक्त तथा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ( Simhastha Kumbh Mela 2027) प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी करून पस्तीस कोटी रुपयांच्या कामाची बोगस वर्कआॅर्डर काढण्यात आली आहे. या घटनेने प्रशासना बरोबरच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ( Nashik News )


याप्रकरणी आयुक्त गेडाम यांचे स्वीय सहायक विजय सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यानिमित्त दोन्ही ठिकाणी गत काही दिवसांपासून विकासकामे सुरू आहेत. या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी सीसीटीव्ही बसविणे, ते कार्यान्वित करणे व त्यांची देखभाल या संदर्भातील वर्कआॅर्डरवर थेट आयुक्त गेडाम यांची बनावट डिजिटल स्वाक्षरी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने काढलेली ही बोगस स्वाक्षरी असलेली वर्कआॅर्डर इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्स एआय आॅटोमेशन सोल्युशन्स, ठाणे या एजन्सीच्या नावे काढली आहे.


फिर्यादीत म्हटले आहे की, २८ एप्रिल रोजी नीळकंठ शेळके नामक व्यक्ती नाशिकरोड( Nashikroad ) येथील विभागीय महसूल आयुक्तालयात आली होती. त्याने दोन संशयास्पद पत्रांच्या वैधतेसंदर्भात विचारणा केली होती. ही पत्रे त्यांना नांदेड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन पाटील चव्हाण यांनी दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.


तपासणीदरम्यान कुंभमेळा प्राधिकरण शाखेचे सहायक संशोधन अधिकारी योगेश सोमवंशी यांना या पत्रातील मजकूर, त्या मधील अंतर व स्वाक्षरीबाबत शंका आली. त्यांनी संबंधित पत्रे आयुक्त गेडाम यांना दाखवली व त्यांना आलेली शंका सांगितली. त्यावर आयुक्तांनी पत्रांचे बारकाईने अवलोकन केले असता, तेंव्हा त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीतील नावाच्या इंग्रजी अक्षरे " Praveen" आणि "Pravin" यांतील घोळ त्यांच्या लक्षात आला.


त्याचबरोबर बनावट डिजिटल स्वाक्षरी करून पस्तीस कोटी रुपये कामाची बोगस वर्कआॅर्डर काढून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. याबाबत अज्ञाताविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने कुंभमेळा प्राधिकरणासह प्रशासकीय वर्तुळात आणि नाशिक जिल्ह्यात मोठीच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी