Ahilyanagar Crime : नशेत शिवीगाळ करणं थेट जीवावर बेतलं, तरूणाची निर्घृण हत्या

अहिल्यानगर : वाकोडी ते बाबुर्डी (ता. नगर) रस्त्यावर किरकोळ शिवीगाळ तरुणाच्या जिवावर बेतलीय. किरकोळ वादातून दोघांनी थेट एकाची ऊसाच्या शेतात नेऊन कृर हत्या केली. तर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून ऊसाच्या शेतात आरोपींनी फेकून दिला. भिंगार कॅम्प पोलिसांनी जलद तपास करत दोन संशयितांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्रसाद रोहीदास जाधव (वय 39, रा. वाकोडी फाटा) असे मृत तरूणाचे नाव आहे.
ही घटना 26 एप्रिल रोजी घडली. (Ahilyanagar Crime News )


मयताच्या पत्नीने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) मिसिंगची तक्रार दिली होती. पोलिसांनी दोन दिवसांत क्लिष्ट गुन्ह्याचा तपास करून दोघांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणात पोलिसांनी शुभम हरी भोसले (वय 20) आणि समाधान उर्फ बाळ्या रामदास सोनवणे (वय 42, दोघे रा. वाकोडी फाटा) यांना अटक केली आली आहे.


नेमकं काय घडलं ?


प्रसाद जाधव हे 26 एप्रिल रोजी दुपारी न्यू आर्ट्स कॉलेज येथे पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र ते परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दुसर्‍या दिवशी हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. तपासादरम्यान बुरूडगाव रस्ता परिसरात प्रसाद यांच्यासोबत दोन संशयित दिसून आले. त्याआधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवत शुभम भोसले आणि समाधान सोनवणे यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी धक्कादायक कबुली दिली. (Ahilyanagar Crime News )


दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याचा संताप अनावर


26 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बुरूडगाव ते बाबुर्डी रस्त्यावर त्यांना एका व्यक्तीने दारूच्या नशेत शिवीगाळ केली. या प्रकारामुळे संतप्त होऊन त्यांनी त्या व्यक्तीला दुचाकीवर बसवून वाकोडी शिवारातील उसाच्या शेतात नेले. तेथे लाकडी दांडक्याने आणि दगडाने डोक्यावर व तोंडावर वार करत त्याचा खून केला. गुन्ह्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून शेतात टाकण्यात आला.


तसेच मृताची दुचाकी सिना नदी पुलाजवळील झुडपात लपवून ठेवण्यात आली होती. संशयितांच्या कबुलीनुसार पोलिसांनी (Bhingar Camp Police Station) शोध घेतला असता वाकोडी शिवारातील गट क्रमांक 158 मधील उसाच्या शेतात पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आला. ओळख पटवल्यानंतर तो प्रसाद जाधव यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Crime News : राज्यातले आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट उद्ध्वस्त, DRI ची कारवाई

मुंबई : मादक द्रव्ये आणि मनोविकारकारक पदार्थांच्या अवैध उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात आपली

US and Canada Murders : रक्ताने माखले परदेशातील पाय; अमेरिकेत आणि कॅनडात भारतीय तरुणांचे खूनी खेळ उघड

परदेशात उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त गेलेल्या भारतीयांशी संबंधित दोन अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक

Shalarth ID Scam : नाशिकच्या गुजर हायस्कूलमध्ये गोलमाल, ११ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल ; नेमके प्रकरण काय ?

Shalarth ID Scam : नाशिकच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडवून देणारा बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास वेगाने सुरु आहे.

Nashik Crime : ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार करत हजारो रुपये उकळले ! नाशिकमध्ये विद्यार्थिनीसोबत संतापजनक कृत्य

Nashik Crime : नाशिकमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षणासाठी शहरात आलेल्या एका विद्यार्थिनीसोबत एका तरुणाने

Crime News : मुलांवर आणि पुरुषांवर लैंगिक अत्याचार करणारा तरुण अटकेत, मोबाईलमध्ये आढळले ६०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून अल्पवयीन मुले आणि तरुण पुरुषांवर लैंगिक अत्याचार

Canada Crime : कॅनडातील हिमांशी खुराना हत्या प्रकरण, अब्दुलला अटक; ८ महिन्यांपासून होता फरार