Thursday, April 30, 2026

नाशिक : काळ्या दगडाच्या तपासासाठी खरातची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, आठव्या गुन्ह्यात खरातला थेट...

नाशिक : काळ्या दगडाच्या तपासासाठी खरातची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, आठव्या गुन्ह्यात खरातला थेट...

नाशिक : काळ्या दगडाच्या तपासासाठी खरातची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, आठव्या गुन्ह्यात खरातला न्यायालयीन कोठडी भोंदू बाबा अशोक खरात याला गुरुवारी ( दि.३०) न्यायालयाने आठव्या गुन्ह्यात सरकारी पक्षाची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रथमच एसआयटीची मागणी न्यायालयाने नाकारल्याने तपास यंत्रणेला काहीसा धक्का बसला आहे.(Ashok Kharat Case )

मागील महिन्यात १५ मार्च रोजी भोंदू बाबा अशोक खरात याला लैंगिक छळ व शोषणासह इतर प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती. आतापर्यंत त्याच्यावर नाशिकमध्ये नऊ गुन्हे दाखल असून, त्यापैकी सात गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र, आठव्या प्रकरणात त्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. (Ashok Kharat Case )

या प्रकरणात यापूर्वी ‘ओशनो जल’, चिंचोके, रिंग मोजमाप अशा विविध बाबींचा उल्लेख झाला होता. आता काळ्या दगडाचाही संदर्भ समोर आल्याने गूढ अधिकच वाढले आहे. गुरुवारी (दि. ३०) एसआयटीने खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले व पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी एसआयटीने संबंधित काळा दगड न्यायालयात सादर केला.

सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्याने तपासाची माहिती न्यायालयाला दिली. सरकारी वकिलाने युक्तिवाद करताना काळ्या दगडाचे गूढ अद्याप उकलले नसल्याचे सांगितले. इतर गुन्ह्यांमध्ये असा दगड आढळला नव्हता, तो प्रथमच या प्रकरणात मिळाला असून, त्याचा उद्देश काय होता याचा तपास आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, पीडित कुटुंबाची आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करत आरोपीची समक्ष चौकशी आवश्यक असल्याचे सांगत पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. (Ashok Kharat Case )

दरम्यान, खरातच्या वकिलांनी तपास यंत्रणेचा युक्तिवाद खोडून काढत आक्रमक भूमिका घेतली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >