Wednesday, April 29, 2026

Watermelon Death Case : कलिंगड खाल्लं अन् एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; दुकानदारानेच सांगितलं सत्य

Watermelon Death Case : कलिंगड खाल्लं अन् एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; दुकानदारानेच सांगितलं सत्य

मुंबई : बिर्याणी त्यानंतर थंडावा मिळावा म्हणून खाल्लेलं कलिंगड आणि थेट मृत्यू किती भयंकर आहे ना हे, मुंबईतील मज्जीद बंदर नजीकच्या पायधुनी परिसरात असाच काहीसा प्रकार घडला आणि एकाच कुटुंबातील चार जणांना आपले प्राण गमवावे लागले, निमित्त ठरलं ते रात्री खाल्लेलं कलिंगड. मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश्य पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. असा पदार्थ आढळला आहे याबाबत रुग्णालयाने कोणताही दावा केलेला नाही.

दुकानदाराने दिले स्पष्टीकरण

या नळ बाजारात डोकडिया या,कुटुंबियांने आमच्याकडून कलिंगड जरी खरेदी केले असले तरी आमच्या आमच्या कलिंगडमध्ये कोणताही दोष नाही आहे. इथून हजारो लोक कलिंगड घेऊन जातात, परंतु एकाच देखील मृत्यू झाला किंवा तब्येत बिघडली आहे अशी कोणी तक्रार केलेली नाही. या प्रकरणात आमची काही चूक नसताना उगाचच आमच्यावर आरोप केले जात आहेत तसेच पोलीस माझ्या मुलाची कसून चौकशी करत आहेत.

कलिंगड खाल्ल्याने मृत्यू होतो अशी भीती बाजारात पसरल्याने कोणीही एकही कलिंगड विकण्यास बाहेर काढत नाही आहे.

पोलीस चौकशीत सहकार्य

दुकानदार म्हणाला की आमच्या इथे पोलीस चौकशीसाठी आले होते, परंतु आमच्या यात काहीही दोष नाही आहे तसेच आम्हाला देखील त्या कुटुंबाबद्दल वाईट वाटत आहे, म्हणून आम्ही पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करणार असे दुकानदाराने सांगितले आहे.

कलिंगडाची खाल्ल्याने असा झाला मृत्यू

डोकडिया कुटुंबांनी २५ एप्रिल रोजी रात्री १.३० वाजता कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्यानंतर चौघांनाही रात्री उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. परंतु या किरकोळ असतील म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं परंतु सकाळची वेदना अधिक तीव्र झाल्या. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्ध झाल्या. यानंतर चौघांनाही तात्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले. त्याआधीच मुलींचा मृत्यू झाला. त्यानंतर पालकांचाही मृत्यू झाला.

Comments
Add Comment