मुंबई: उन्हाळा येताच बाजारात कलिंगड(waterlmelon) दिसण्यास सुरूवात होते. कलिंगडाची वाट सगळेच पाहत असतात. उन्हाळ्यामध्ये रसदार कलिंगड खायला साऱ्यांनाच आवडते. कलिंगड हे असे फळ आहे जे प्रत्येकाला आवडते. यातील अनेक पोषकतत्वे आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.
जाणून घ्या याचे फायदे
कलिंगडामध्ये ९० टक्के पाणी असते त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते. कलिंगडामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात यामुळे वजन कमी करण्यास कलिंगड महत्त्वाची भूमिका निभावते. यामुळे कलिंगडामध्ये ब्लड प्रेशर, हाडे, दातांचा त्रास, डोळ्यांचा त्रास, पेशींचे पुनर्निमाण तसेच कॅन्सरसारख्या आजारांविरोधात लढण्याचे गुण आहेत. यातील पोषकतत्वे शरीराला सुधारण्यास मदत करतात.
कापलेले कलिंगड चांगले की नाही?
कलिंगड हे खाण्यासाठी चविष्ट लागतेच मात्र त्याचे आरोग्यासही अनेक फायदे आहेत. मात्र अनेकदा लोक कापलेले कलिंगड अर्धे कापून ठेवतात आणि काही दिवसांनी खातात. तुम्हाला माहीत आहे का कापलेले टरबूज खाणे किती दिवसांपर्यंत योग्य असते? कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण मोठे असते त्यामुळे तारीख सांगणे थोडे कठीण असते मात्र कलिंगड कापल्यास ते लगेचच खाल्ले पाहिजे. जर एकावेळेस कलिंगड खाल्ले नाही तर याला थंड जागेवर ठेवावे. यामुळे ते चांगले राहते. मात्र यानंतर त्याचा स्वाद आणि गुणवत्ता राहत नाही.