Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा


अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७ ऑगस्टपर्यंचे नियोजन


मुंबई : पावसाळा तोंडावर आला असला तरी अन निनोेचे सावट कायम असल्यामुळे पावसाचा नेमका अंदाज बांधणे अशक्य आहे. तरीही पाऊस लांबणीवर पडण्याची दाट शक्यता लक्षात घेता येत्या १५ मे पासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी जाहीर केले. सध्या तलावांमधील उपलब्ध साठा आणि राज्य शासनाकडून भातसा आणि वैतरणा धरणातून निभावणी साठा अर्थात राखीव कोट्यातील पाणी याच्या आधारे पाण्याचे नियोजन करताना दहा टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे उपलब्ध साठा, राखीव साठ्यातील पाणी आणि कपातीनंतर बचत केलेला साठा याद्वारे पाणी वाचवून येत्या १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुरेल एवढा पाणी साठा राखून मुंबईकरांची पाण्यामुळे कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.


 

[caption id="attachment_1020688" align="alignnone" width="442"] water cut news[/caption]

 


मान्सूनपूर्व आढावा संदर्भात विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, भातसा,मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार, तुळशी, मोडक सागर या सर्व धरणांमध्ये सध्या २८ टक्के एवढा पाणी साठा उपलब्ध अल निनोचा प्रभाव लक्षात घेता पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवली जात आहे. येत्या १ मे नंतर याची आणखी स्थिती समजू शकेल. परंतु सध्या उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यामध्ये पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करणे आवश्यक आहे.



तलावातील पाणी साठा कमी झाल्याने भातसामधून १४७ एमसीए आणि वैतरणातून ९० एमसीए अशाप्रकारे २३७ एमसीए एवढा निभावणी साठ्यातील पाणी वापरण्यास परवानगी मिळावी म्हणून मागणी केली आहे. त्याला मंजुरी प्राप्त होईल. त्यामुळे उपलब्ध साठा आणि निभावणी साठ्यामधील पाणी वापरले तरी आतापर्यंत ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करता येत नाही. त्यामुळे दहा टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. ही कपात केल्यास मुंबईला १७ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवले जावू शकते. परंतु सध्याचा उपलब्ध पाणी साठा ४ जुलैपर्यंतच पुरेल एवढा आहे. त्यामुळे येत्या १५ मे पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Comments
Add Comment

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या