Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

नवी दिल्ली : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळाला. अजित पवारांचा विमान अपघात झाला होता? की विमानाचा अपघात होण्यामागे कोणाचा हात होता का? याचे उत्तर अद्याप समोर आले नाही, परंतु अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, ते VSR कंपनीचे होते. या अपघातानंतर VSR कंपनीला विरोध करण्यात आला असला तरी त्याच विमानातून पार्थ पवार यांनी प्रवास केला अन् राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे.



पवार कुटुंबाचं स्नेहभोजन


शरद पवार यांनी आपल्या पुण्यातील मोदी बाग येथील घरात पवार कुटुंबाच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता, यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. पार्थ पवार दिल्लीत राज्यसभेवर असल्याने ते या कार्यक्रमाला येतील की नाही? असे प्रश्न उपस्थित झाले होते.




पार्थ पवार यांचा स्पष्टीकरण


पार्थ पवार यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे, 'पुण्यात मोदी बागेत साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे होते त्यामुळे मी माझ्या कार्यलयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितलं होत, शेवटच्या क्षणी आलेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation च्या कंपनीचं विमान बुक झालं. विमानतळावर पोहोचे पर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. असे पार्थ पवारांनी सांगितले




VSR कंपनीसोबत करार रद्द


या चुकीची गंभीर दखल घेतली जाणार असून विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तात्काळ रद्द करत आहोत. तसेच कर्मचारी आणि सहकारी वर्गाकडून अशा चुका होऊ नयेत यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत


VSR कंपनीबद्दल असलेला रोष आणि विरोध हा कायम आहे आणि यापुढेही राहील, यावरून निर्माण झालेला वाद हा निरर्थक असून, इतरांनी सत्य परिस्थिती जाणून घेऊनच बोलावे असे पार्थ पवारांनी स्पष्ट केले आहे

Comments
Add Comment

Smriti Irani News : भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महिलांना मोठं स्थान; स्मृती इराणींचे मुख्य संघटनेत दणकेबाज कमबॅक!

नवी दिल्ली : आगामी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या नव्या

Lakshmanan Meyyappan Youngest CA : अवघ्या १६ व्या वर्षी कमाल! लक्ष्मणन मेय्यप्पन ठरला जगातील सर्वात तरुण 'चार्टर्ड अकाउंटंट'

दुबई : वयाच्या सोळाव्या वर्षी जिथे बहुतेक तरुण आपल्या भविष्याची आणि करिअरची दिशा शोधत असतात, तिथे एका भारतीय

Ujjain Mahakal Stampede : उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; नागचंद्रेश्वर दर्शनादरम्यान चेंगराचेंगरीसारखी स्थिती, १३ जण जखमी

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी उज्जैन (Ujjain) येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात (Malakaleshwar Temple) महादेवाच्या

Laxmi Mittal Ukraine Steel Plant : लक्ष्मी मित्तल यांच्या स्टील प्लांटवर रशियाचा मिसाईल हल्ला; २ जणांचा मृत्यू, १४ कर्मचारी जखमी

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्ध अधिकच तीव्र होत असून, रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एकावर

Gyanvapi Mosque : ज्ञानवापी प्रकरणातील न्यायमूर्ती पुन्हा चर्चेत; आतापर्यंत 35 दोषींना सुनावली फाशीची शिक्षा

उत्तर प्रदेश : ज्ञानवापी मशीद प्रकरणात सर्वेक्षणाचे आदेश देणारे उत्तर प्रदेशातील न्यायमूर्ती रवी कुमार दिवाकर

Fire at a hotel in Birbhum : तारापीठ मंदिर परिसरात भयंकर आग! साखरझोपेत ७ भाविकांचा जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू!

पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ येथे एका हॉटेलला पहाटेच्या