BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष


मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१ खासगी इमारतींचा समावेश आहे. त्यातील ७२ इमारती या खाली करण्यात आलेल्या आहेत तर इतर विविध इमारती या न्यायालयीन वादात अडकलेल्या असल्याने त्या खाली करणे आणि त्या इमारती पाडणे यामध्ये विविध अडचणी निर्माण झालेले आहेत.


मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा आढावा महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मुंबईतील विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुंबईत एकूण १७४ इमारतींना, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ चे कलम ३५४ अन्वये 'अतिधोकादायक व मोडकळीस' घोषित करण्यात आले असल्याची माहिती भिडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यामध्ये १४१ खाजगी इमारतींचा समावेश आहे. या खासगी १४१ अतिधोकादायक इमारतींपैकी एकूण ३२ इमारती शहर, ८० पश्चिम उपनगरे आणि २९ पूर्व उपनगरातील आहेत.



या इमारतीतील रहिवाशांना त्यांची निवासस्थाने रिक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून वेळोवेळी सूचना आणि आवाहन करण्यात आले आहे. तर, काही इमारतींमध्ये अद्यापही नागरिक वास्तव्यास आहेत. अशा इमारतींत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी तत्काळ ताबा सोडून सदर इमारत स्वतःहून निष्कासित करावी. उपकर प्राप्त इमारती व इतर आहेत. धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारती बाबत संबंधित सक्षम प्राधिकरण यांनी गरजेप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात.


या एकूण १७४ अतिधोकादायक इमारतींपैंकी ७२ इमारती रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत, तर ७१ इमारतींना न्यायालयीन स्थगिती आहे. संबंधित इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची राहील.


इमारती बाबत संबंधित सक्षम प्राधिकरण यांनी गरजेप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात. संबंधित इमारत कोसळून कोणतीही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची राहील,असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.



तसेच म्हाडाच्या उपकर प्राप्त तसेच ना उपकर प्राप्त ज्या अतिधोकादायक आहेत, त्यांचीही काळजी म्हाडा दुरुस्ती मंडळाच्यावतीने घेतली जात आहे. त्यामुळे रेल्वे रुळा लगत ज्या अशा धोकादायक इमारती आहे, जुन्या इमारती आहे, त्यांचा प्रस्ताव रेल्वेला सादर करण्याचाही सूचना करण्यात आल्या आहे, जेणेकरून रेल्वेला काही भविष्यात उपाययोजना असल्यास म्हाडाला पुनर्विकासाला मंजुरी देताना विचारात घेता येवू शकतील असेही त्यांनी नमुद केले.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक