Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबाबत नवा फॉर्म्युला

दंडात्मक कारवाईला तूर्तास ब्रेक; १ मेपासून राज्यव्यापी मोहीम, चालकांना सहा महिन्यांचा 'दिलासा'


मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी परिवहन विभागाने आता मध्यमार्ग स्वीकारला आहे. १ मेपासून राज्यभर मराठी सक्तीची मोहीम सुरू होणार असली, तरी केवळ भाषा येत नाही म्हणून चालकांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी आरटीओ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा 'नवा फॉर्म्युला' जाहीर केला असून, चालकांना अप्रत्यक्षपणे सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.



मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधात टॅक्सी-रिक्षा चालक संघटनांनी ४ मे रोजी संपाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत सरकारने काहीसा मवाळ पवित्रा घेतला आहे. "मराठी भाषेचा सन्मान राखणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि चालकांनीही मराठी शिकण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, केवळ भाषेच्या मुद्द्यावरून कोणाचीही रोजीरोटी हिरावली जाणार नाही," असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. मात्र, नियमभंग, प्रवाशांची फसवणूक किंवा चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा अधिकार विभागाकडे अबाधित राहील, असा इशाराही त्यांनी दिला.



आरटीओ कार्यालयांत 'मराठीची शाळा'


चालकांना व्यवहारीक मराठी शिकता यावी, यासाठी सरकारने विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यातील सर्व ५९ आरटीओ कार्यालयांमध्ये चालकांसाठी मराठी शिकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच 'ऑटोरिक्षा चालकांसाठी मराठी' ही विशेष पुस्तिका वितरित केली जाणार आहे. २०१६ मधील निर्णयानुसार २०२० मध्ये ही पुस्तिका तयार करण्यात आली होती, तिचे आता पुनर्वितरण केले जाईल. यामुळे प्रवाशांशी संवाद साधताना चालकांना अडचणी येणार नाहीत, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.




समितीमार्फत होणार पडताळणी


या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक आरटीओ कार्यालयात एक विशेष समिती स्थापन केली जाईल. ही समिती कोणत्या चालकांना मराठी येत नाही, याची माहिती संकलित करेल. या अहवालाच्या आधारे पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत. महाराष्ट्र हे रोजगार देणारे राज्य असले तरी मराठीचा वापर वाढणे अनिवार्य आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात