Mayor's Residence : महापौरांच्या निवासस्थानाचे होणार नुतनीकरण

- रितू तावडे यांचा गृहप्रवेश लांबणीवर


मुंबई ( विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापौर पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर रितू तावडे यांनी अद्यापही राणीबागेतील महापौर निवासस्थान राहण्यास गेलेले नाही. मागणीला साडेतीन वर्षांपासून महापौर निवासस्थान बंद असल्यामुळे या निवासस्थानाची डागडुजी तसेच सुधारणा केली जात आहे. त्यामध्ये सध्याच्या निवासस्थानांमध्ये सुधारणा करतानाच दोन अतिरिक्त शौचालयांची सुविधा तसेच तळ मजल्यावरील सभास्थानाचे वापराच्या खोलीमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महापौरांनी ही सुधारणा करून घेण्यासाठी आपला गृहप्रवेश लांबणीवर टाकला असून आपल्यासह अडीच वर्षांनंतर येणाऱ्या नवीन महापौरांसाठीही सुसज्ज वास्तू राहावी याचा विचार करत विद्यमान महापौरांनी एकदाच नुतनीकरणाचा आराखडा बनवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार या वास्तूंचे नुतनीकरण करण्यात येत आहे.



मुंबईच्या महापौरपदी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रितू तावडे यांची निवड झाल्यानंतर भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयातील ऐतिहासिक बंगल्यात प्रवेश करणे अपेक्षित होते. परंतु, हा बंगला प्रशासक कालावधीमध्ये बंद असल्यामुळे याला वाळवी लागली होती. त्यामुळे हे काम करून बंगला सुस्थितीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु यातील काही लाद्या तुटल्याने त्या बदलण्यास इतर ही सुधारणा करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला केल्या.त्यानुसार प्रशासनाने या बंगल्याचे नुतनीकरण, पहिल्या मजल्यावरील बेडरुम मध्ये अतिरिक्त शौचालय आदींची कामे केली जाणार आहे. यासाठी ३ कोटी ४८ लाख २४ हजार ९३० रुपये खर्च करण्यात येणार आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या कामांसाठी ब्युकॉन इंजिनिअरींग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.



बंगल्यात होणार अशी कामे


बंगल्याच्या अंतर्गत फर्निचरची पूर्णतः दुरुस्ती करणे


सर्व शौचालयांचे नवीन टाईल्स, फिक्स्चर्स, डब्ल्यूसी बसवून नूतनीकरण करणे


पहिल्या मजल्यावरील बेडरुमसाठी अतिरिक्त शौचालयाची व्यवस्था करणे


तळमजल्यावर अतिरिक्त बेडरुमची व्यवस्था करणे.


पुरातन पद्धतीची झुंबरे व प्रकाशयोजना करणे


तळमजल्यावरील सभागृहाचे बैठकीच्या खोलीमध्ये रुपांतर करणे


अत्याधुनिक सोयीसुविधांसह स्वयंपाकगृहाचे पूर्णपणे नूतनीकरण करणे


तळमजल्यावर इटालियन मार्बल्सनी संपूर्ण फरशीचे नूतनीकरण करणे


पुरातन पद्धतीचे व्हेनेशीयन लावणे


तळमजल्यावर अतिरिक्त शौचालय बांधणे

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.