Mysterious Deaths of Scientists : अमेरिकेनंतर चीनमधील शास्त्रज्ञांच्या रहस्यमय मृत्यूंनी वाढवली जागतिक चिंता; नेमकं प्रकरण काय?

मुंबई : जगाचं लक्ष वेधून घेतलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्ष अजून निर्णायक टप्प्यावर पोहोचलेलं नसतानाच, आणखी एक चिंताजनक घडामोड समोर आली आहे. अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये पडद्यामागे ‘सायलेंट वॉर’ सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गेल्या दोन वर्षांत चीनमधील संरक्षण आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रकल्पांशी संबंधित किमान ८ प्रमुख शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी अमेरिकेतही १० अणुशास्त्रज्ञांच्या मृत्यूंची चौकशी सुरू झाल्याने या घटनांनी जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.


या सर्व प्रकरणांमध्ये एक समान धागा आढळतो , तो म्हणजे मृत झालेले शास्त्रज्ञ अत्याधुनिक आणि संवेदनशील क्षेत्रांमध्ये कार्यरत होते. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), अणुसंशोधन, हायपरसोनिक शस्त्रास्त्रे आणि अंतराळ संरक्षण यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळे हे मृत्यू अपघाती आहेत की यामागे कोणता मोठा कट आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.



एका अहवालानुसार, २०२३ ते २०२५ दरम्यान चीनच्या हायपरसोनिक मिसाइल, ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत रसायनशास्त्राशी संबंधित ८ अग्रगण्य शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला. यातील काही मृत्यू रस्ते अपघातात झाले, तर काहींचा मृत्यू अज्ञात आजार किंवा संशयास्पद परिस्थितीत झाला. विशेष म्हणजे, या घटनांबाबत चीनकडून अत्यंत गोपनीयता राखण्यात आली आहे.


चीनच्या लष्करी घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या संशोधकांच्या मते, काही घटनांमध्ये वेळ, परिस्थिती आणि अधिकृत अहवालांतील भाषा संशय निर्माण करणारी आहे. उदाहरणार्थ, लष्करी एआय तज्ज्ञ फेंग यांगहे यांचा मध्यरात्री झालेला अपघात आणि त्याबाबतच्या वर्णनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.


या मालिकेत चेन शुमिंग, फेंग यांगहे, झोऊ गुआंगयुआन, लिऊ डोंगहाओ, झांग शियाओशिन, झांग दाईबिंग, ली मिनयोंग, फांग दाईनिंग आणि यान हाँग यांसारख्या अनेक तज्ज्ञांचा समावेश आहे. हे सर्व जण लष्करी एआय, हायपरसोनिक्स, ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत शस्त्र प्रणालींसारख्या धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत होते.



विशेषतः ‘स्वार्मिंग टेक्नॉलॉजी’सारख्या अत्याधुनिक संकल्पनांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांमध्ये मृत्यूंचे प्रमाण जास्त असल्याचेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.


तथापि, काही तज्ज्ञांच्या मते या सर्व घटना केवळ अपघात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण एकाच प्रकारच्या संवेदनशील क्षेत्रांतील शास्त्रज्ञांभोवती घडणाऱ्या या घटना पाहता, या मागे काहीतरी मोठं रहस्य दडलेलं असल्याची चर्चा जागतिक स्तरावर रंगत आहे.

Comments
Add Comment

Russian cosmonaut : रशियन अंतराळवीरांकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या विशेष शुभेच्छा

नवी दिल्ली : भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील रशियन

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख

Iran-US tensions : जमिनीवरील हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा, ट्रम्प यांच्या माघारीच्या प्रयत्नांना खीळ  

इराण आणि अमेरिका यांच्यातील भू-राजकीय तणाव दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अमेरिकेचे लष्कर इराणी भूमीवर

Mumbai Terror Attack : २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल अजीजचा संशयास्पद मृत्यू; मशिदीच्या गेटवर अचानक कोसळला, विषप्रयोगाची शक्यता?

- इस्लामाबादमध्ये अनोळखी ठिकाणी जेवण केल्यानंतर काही वेळातच मृत्यू इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी

Russia-India Trade : भारतासाठी रशियाची मोठी योजना; हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा विचार

मुंबई : भारत आणि रशियामधील व्यापार संबंध आणखी मजबूत करण्यासाठी रशिया नव्या पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.

US-Iran : अमेरिकेसोबत थेट चर्चा नाही; इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची

तेहरान : इराण सध्या अमेरिकेशी थेट वाटाघाटी करत नसून, दोन्ही देशांमध्ये मध्यस्थांच्या माध्यमातून संदेशांची