नाशिक : अशोक खरातने निर्माण केलेल्या मायाजालाच कोड काही सुटता सुटत नाही आहे. आतापर्यंत त्याच्या विरुद्ध तब्बल १९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, भविष्यात ही नोंद आणखी वाढू देखील शकते. एका गुन्ह्याची नोंद होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच दुसऱ्या गुन्ह्याची नोंद होत आहे आणि अशोक खरातला या गुन्ह्यांची कबुली देता देता नाकी नऊ आले आहेत.
अशोक खरात मागील ३८ दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे, त्याची सध्या एसआयटी, इन्कमटॅक्स आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे सातत्याने चौकशी होत आहे. मात्र अशोक खरात पोलिसांसोबत चलाखी करत आहे, असा संशय आता निर्माण झाला आहे. जवळपास मागील ३८ दिवसांपासून पोलिसांना चक्रावून सोडतो आहे.
अनेक महिलांनी याच्या विरुद्ध हिम्मत करून गुन्हे नोंदवले, या सगळ्या तक्रारींमध्ये एक साम्य आढळले ते म्हणजे अशोक खरात महिलांना स्पर्श करण्याआधी प्यायच्या पाण्यामधून त्यांना एक औषध मिसळून द्यायचा. त्याने महिलांना गुंगी यायची आणि महिला खरातच्या बोलण्यात अडकायच्या, आणि याचा फायदा उचलत तो महिलांशी अश्लील वर्तन करायचा.
शुक्रवारी अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान न्यायालयाने त्याला २६ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल
रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत संपण्याचे नाव घेत नाही आहे. जमीन खरेदी ...
औषधाचे गुपित अजूनही कायम
महिलांना देण्यात येणारे औषध हे कोणते होते याबाबत अद्याप खरातने पोलिसांना कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही आहे. अत्याचार करण्यापूर्वी देण्यात येणाऱ्या पाण्यात कोणते औषध मिसळले जायचे.या औषधाचा पुरवठा नेमका कुठून व्हायचा याबाबत खरातने आपले तोंड अजूनही उघडले नाही आहे.
Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरण भोवलं, बड्या पदावरील व्यक्तीच्या राजीनाम्याने खळबळ
नाशिक : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने भल्याभल्यांची झोप उडवली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करण्यासह अशोक खरातने भोंदुगिरी आणि आर्थिक ...






