Friday, April 24, 2026

Pune Accidental News : पुण्यात धक्कादायक घटना; खेळताना घसरगुंडी अंगावर पडली अन् चिमुकलीचा....

Pune Accidental News : पुण्यात धक्कादायक घटना; खेळताना घसरगुंडी अंगावर पडली अन् चिमुकलीचा....

पुणे : बागेतली घसरगुंडी नेहमीच मुलांची आवडती असते, पण याच घसरगुंडीचा खेळ कोणाच्या जीवावर बेतला तर? पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बागेत घसरगुंडीवर खेळणाऱ्या ४ वर्षीय मुलीचा घसरगुंडी कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यात हडपसरमधील मगरपट्टा परिसरात ही घटना घडली आहे. सोसायटीच्या आवारात लोखंडी घरसरगुंडी अंगावर कोसळून साडेचार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. अनिका नवनाथ देवीकर असं मृत मुलीचे नाव आहे. ७ एप्रिल रोजी एप्रिल रोजी दुपारी अनिका सोसायटीच्या आवरत खेळत होती. सोसायटीत मुलांसाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी घसरगुंडीचा आधार व्यवस्थित नसल्याने ती अचानक कोसळली.

अनिकाचा मृत्यू

या अपघातात अनिकाच्या डोक्याला, चेहऱ्याला, आणि मानेला गंभीर दुखापत झाल्यामुळे ती जागेवरच बेशुद्ध पडली, तातडीने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु १८ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या चिमुकलीची आज प्राणज्योत मालवली.

सोसायटीच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

घसरगुंडीबाबत अनेक तक्रारी देऊनही चेअरमनने याकडे दुर्लक्ष केले, घसरगुंडी काढून टाकण्याबाबत अनेक तक्रारी केल्या परंतु योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, चेअरमनच्या या निष्काळजीपणामुळेच आज अनिका हे जग सोडून गेली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >