अमेरिकेने रंग दाखवला मग भारतासाठी चीन उभा राहिला, चीनने थेट भारताचा झेंडा पोस्ट करत म्हटले....

Donald Trump on India: बाळ जन्माला येते आणि लगेच अमेरिकन नागरिक होते, 'इथे एका मूलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि ते संपूर्ण कुटुंबाला मग तो चीन असो भारत वा जगाच्या इतर कुठल्या नरकातून घेऊन येतं.' अशा शब्दात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात आणि भारतीयांवर गरळ ओकली. ट्रम्प 'बर्थराईट सिटीझनशिप'च्या विरोधात असून, भारत आणि चीनमधून होणाऱ्या स्थलांतरामुळे अमेरिकेचे नुकसान होत असल्याचे चित्र उभे करण्यासाठी थेट नरकाशी तुलना केली आहे.

ट्रम्प यांनी जन्मजात नागरिकत्वाच्या कायद्यावर टीका करणारा मायकल सॅव्हेज (Michael Savage) यांचा व्हिडिओ शेअर करून या कायद्याच्या दुरुस्तीची गरज अधोरेखित केली आहे. स्थलांतरित लोक केवळ नागरिकत्व मिळवण्यासाठी गरोदरपणाच्या नऊ महिन्यांत अमेरिकेत येतात आणि या कायद्याचा आधार घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करतात, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ट्रम्प यांच्या या विधानावर आता भारत-चीन ध्वज शेअर करत चीन दूतावासाच्या प्रवक्त्याने तिखट भाषेत सुनावले आहे.

भारतातील चीन दूतावासातील प्रवक्त्या यू जीन यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट शेअर ट्रम्प यांना सुनावले आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, "व्हायरल झालेले शब्द विरून जातात. पण, खरी भागीदारी संपून जात नाही. द्विपक्षीय संबंध हे बडबडीवर नाही, तर एकमेकांच्या सन्मानावर टिकून असतात", अशा शब्दात त्यांनी ट्रम्प यांना सुनावले. यावेळेस त्यांनी चीन आणि भारताचा झेंडा देखील पोस्ट केला आहे.
Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन