Ambenali Ghat : आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; ७०० फूट दरीत कोसळून दांपत्याचा मृत्यू, बचावकार्याला पावसाचा अडथळा

सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ, पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघातात बाईकस्वार दांपत्याचा सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आंबेनळी घाटातील एका अतिधोकादायक वळणावर स्प्लेंडर बाईक बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेवरून बाईकवरील प्रवासी दरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यानंतर तात्काळ प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली.


शोधकार्यादरम्यान सुमारे ७०० फूट खोल दरीत संबंधित दांपत्याचा मृत अवस्थेत शोध लागला. मृतांची ओळख मोहन चव्हाण (वय ५५) आणि जयश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी) अशी झाली आहे. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून स्थानिक स्तरावर शोककळा पसरली आहे.



दरम्यान, घटनास्थळी अवकाळी पाऊस आणि दाट धुके यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनले आहे. निसरड्या उतारांमुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे रेस्क्यू टीमला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.


या घटनेत पोलादपूर पोलीस आणि महाबळेश्वर पोलीस यंत्रणेनेही तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला हातभार लावला आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.



आंबेनळी घाट हा अत्यंत धोकादायक वळणांचा आणि खोल दऱ्यांचा घाट म्हणून ओळखला जातो. विशेषतः पावसाळ्यात रस्ता घसरडा होत असल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना वेग मर्यादित ठेवावा, सतर्कता बाळगावी आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'दहीहंडी'च्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी प्रयत्न करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; वरळीत दिमाखात पार पडले 'प्रो-गोविंदा' लीगचे उद्घाटन मुंबई :

Chandrakant Patil : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांत मराठी भाषा विभाग अनिवार्य; NEPच्या प्रभावी अंमलबजावणीचा चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण

Vaishali Nagwade : अजितदादांच्या स्मृतींना राखी अर्पण; ‘तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू’ - वैशाली नागवडे

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा

Dr. Neelam Gorhe : गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मोक्का दाखल

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी

Tribal Hostel Age Limit Removed : आदिवासी वसतीगृहातील प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द

- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मुंबई : राज्यातील आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील प्रवेशासाठीची वयोमर्यादेची

Nanded Loha Child Case Pocso : नांदेड हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded News) लोहा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली